TRENDING:

Maruti ने अखेर डाव टाकला, पहिली इलेक्ट्रिक SUV केली लाँच, किंमतही केली जाहीर

Last Updated:

भारतात आणण्याआधी मारुतीने यूकेमध्ये ही कार लाँच केली. ई-विटारा पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने अखेर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. मारुतीने आपल्या पहिल्या वहिल्या ई-विटारा ईलेक्ट्रिक एसयूव्हीवरून पडदा बाजूला केला आहे.  भारतात आणण्याआधी मारुतीने यूकेमध्ये ही कार लाँच केली. ई-विटारा पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. यूकेमध्ये या एसयूव्हीची किंमत सुमारे  २९,९९९ पाउंड भारतीय चलनातसुमारे ३५ लाख रुपये ते ४४ लाख इतकी आहे. सुझुकीच्या पहिल्या पूर्ण-इलेक्ट्रिक कारची किंमत महाग वाटू शकते. पण, भारतात या कारची किंमत कमी असणार अशी शक्यता आहे.
News18
News18
advertisement

सुझुकी मोटर्स कंपनीच्या गुजरातमधील हंसलपूर प्लँटमध्ये ही ई-विटाराचं उत्पादन घेण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात ई-विटाराची  किंमत या तुलनेत आणखी कमी असणार आहे.  यूकेमध्ये, ई विटारा दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: मोशन आणि अल्ट्रा, वेगवेगळ्या ट्रिमसह.

२ बॅटरी पर्याय

advertisement

ई विटारा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एंट्री-लेव्हलमध्ये ४९ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये ६१ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे.  ४९ किलोवॅट क्षमतेचं हे मॉडेल १४२ बीएचपी आणि १९२.५ एनएम टॉर्क जनरेट करते आणि फ्रंट-व्हील-ड्राइव्ह सेटअपसह सिंगल मोटरसह येतं.  तर ४९ किलोवॅट क्षमतेचे हे मॉडेल WLTP फॉरमॅटमध्ये ३४६ किमीची रेंज देते. मोठी ६१ किलोवॅट क्षमतेची बॅटरी सिंगल आणि ड्युअल मोटर ट्रिममध्ये उपलब्ध आहे. सिंगल मोटर मॉडेल १७२ बीएचपी आणि १९२.५ एनएम आउटपुट करते आणि ४२८ किमी पर्यंतची ड्राइव्ह रेंज देते. ट्विन मोटर व्हर्जन १७५ बीएचपी आणि ३०० एनएमचा पीक टॉर्क आउटपुट देते. त्याची ४१२ किमी (डब्ल्यूएलटीपी) ची रेंज असल्याचा दावा केला आहे.

advertisement

लेव्हल २ ADAS

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

ई विटारा ही भारतातील पहिली मारुती सुझुकी एसयूव्ही आहे. जी लेव्हल २ एडीएएसने सज्ज असेल. याशिवाय, या एसयूव्हीमध्ये 7 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि इतर सुरक्षा फिचर्स दिले आहेत. ई विटारा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, जे पाच मॉडेलमध्ये विभागले गेले आहेत. ४९ किलोवॅट क्षमतेची लहान बॅटरी फक्त मोशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तर ऑल-व्हील-ड्राइव्ह आवृत्ती मोशन आणि अल्ट्रा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ई विटारा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, महिंद्रा BE-6, टाटा curvv EV आणि MG ZS ईव्हीशी स्पर्धा करेल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Maruti ने अखेर डाव टाकला, पहिली इलेक्ट्रिक SUV केली लाँच, किंमतही केली जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल