Tata Punch इंजिन
टाटा पंचमध्ये 1199 सीसी 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. जे 6,000 rpm वर 87.8 PS पॉवर आणि 3,150-3,350 rpm वर 115 Nm टॉर्क निर्माण करते. या गाड्यांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत. टाटा पंचच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 19-20 kmplचा मायलेज देखील देते.
advertisement
6 एअरबॅगसह मिळतात भारतातील या स्वस्त कार! अवश्य चेक करा पूर्ण लिस्ट
Tata Punchची किंमत
सुरक्षिततेच्या बाबतीतही टाटा पंच हे खूपच चांगले वाहन आहे. या कारला ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. जे तिची ताकद दर्शवते. या टाटा कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. यासोबतच, लहान मुलांसाठी ISOFIX आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सारख्या सेफ्टी फीचर्सचा ऑप्शन उपलब्ध आहे. या कारची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.32 लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूम आहे.
मारुती स्विफ्टचे इंजिन
मारुती स्विफ्टच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1.2-लिटर झेड-सिरीज इंजिन वापरले गेले आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 24.80 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 25.75 kmpl प्रति लिटर मायलेज देण्याची क्षमता आहे. याशिवाय, ही कार सीएनजी मोडमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह 32.85 किमी/किलो मायलेज देते.
Mahindra ची टँकसारखी SUV, सेफ्टीमध्ये टाटाची केली बरोबरी, किंमतही केली कमी!
मारुती स्विफ्टची फीचर्स आणि किंमत
मारुती स्विफ्टला टाटा पंचपेक्षा जास्त एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये एकूण 6 एअरबॅग्ज समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यापूर्वी या कारमध्येही फक्त दोन एअरबॅग्ज होत्या. यासोबतच या कारमध्ये हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ISOFIX आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेराची फीचर्स देखील देण्यात आली आहेत. युरो एनसीएपीने क्रॅश टेस्टमध्ये मारुती स्विफ्टला -स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून ते 9.64 लाख रुपयांपर्यंत आहे.