सीएनजी कार खिशाला परवडतात. सीएनजीचा खर्च पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी असतो. सीएनजी व्हॅरिएंटमध्ये मायलेज चांगलं मिळतं. सीएनजी गाड्यांमुळे प्रदूषण कमी होतं. त्यामुळेो पर्यावरणासाठीही सीएनजी गाड्या चांगल्या आहेत. या हॅचबॅक कारमध्ये ग्राहकांना 1.2-लिटर तीन सिलिंडर झेड12ई नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे आता असलेल्या 1.2 लिटर के सीरिज चार सिलिंडर इंजिनच्या तुलनेत खूप चांगलं मायलेज देतं.
advertisement
किंमत किती?
स्विफ्ट सीएनजीचे भारतीय बाजारात VXI, VXI (O) आणि ZXI हे व्हॅरिएंट्स लाँच करण्यात आले आहेत. या कारचा बेस व्हॅरिएंट VXI हा आहे. या व्हॅरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8,19,500 रुपये आहे आणि टॉप व्हॅरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9,19,500 रुपये आहे.
इंजिन आणि पॉवर
मारुतीने स्विफ्ट सीएनजीमध्ये नवीन झेड सीरिज इंजिन दिलं आहे. पेट्रोल इंजिनशी तुलना करायची झाली तर दोन्हीत काही बदल पाहायला मिळतात. 1.2 लिटरचं इंजिन सीएनजी मोडमध्ये 69.75 पीएस पॉवर आणि 101.8 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं.
स्विफ्ट सीएनजीची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
मारुती स्विफ्ट ही भारतातल्या सर्वांत लोकप्रिय कारपैकी एक आहे. आता या कारच्या सीएनजी व्हॅरिएंटमध्ये ग्राहकांना पेट्रोल व्हॅरिएंटप्रमाणेच फीचर्स दिली जात आहेत. यात एबीएस, ईएसपी प्लस, स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसंच ग्राहकांना कारमध्ये सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि सुझुकी कनेक्टसारखी फीचर्स मिळतात.