८४ लाखांची कार २.५ लाखात विकली
दिल्लीच्या वरुण विजने २०१५ मध्ये मर्सिडीज-बेंझ ML350 ही आलिशान कार ८४ लाख रुपयांना विकत घेतली होती. पण आता दिल्ली सरकारच्या नवीन नियमानुसार, १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना आता इंधन मिळणार नाही, असं धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या सक्तीमुळे वरुण विज याांनी आपली मर्सिडीज कार कार फक्त २.५ लाखांना विकावी लागली. कारणस ही कारण आता दिल्लीत काहीच उपयोगाची नव्हती.
advertisement
दिल्लीत डिझेल बंदी
दिल्लीमध्ये आता १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना आता इंधनच मिळणार नाही आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांनाही हाच नियम लागू आहे. पण हा नियम सध्या फक्त दिल्लीतच लागू आहे. जर वरुण यांनी ही कार दिल्लीबाहेरील एखाद्याला विकली असती तर त्याला कदाचित त्याची किंमत खूप चांगली मिळाली असती. यासाठी अनेक ऑनलाइन वेबसाईट आहेत. ज्या संपूर्ण भारतात सेकंड हँड कार विकतात. अशा परिस्थितीत, वरुण यांना त्याच्या कारसाठी खूप चांगली किंमत मिळू शकली असती.
सीएनजी कीट
कारमध्ये सीएनजी किट बसवणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. दिल्लीत सीएनजी कारवर बंदी नाही, म्हणून जर तुम्ही तुमच्या कालबाह्य झालेल्या कारमध्ये सीएनजी बसवले तर तुम्ही सहजपणे इंधन भरू शकता आणि बराच काळ गाडी चालवू शकता. सीएनजी पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त आहे, ज्यामुळे इंधनाचा बराच खर्च दीर्घकाळात वाचू शकतो.