Magniteवर 86,000 रुपयांची सूट
निसान मोटर इंडिया त्यांच्या मॅग्नाइटवर 86,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी मोठी सूट का दिली जात आहे? खरं तर, कंपनी दोन लाख युनिट्सची विक्री पूर्ण झाल्याच्या आनंदात ती देत आहे. 86 हजारांच्या या सूटबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही निसान डीलरशिपशी संपर्क साधू शकता. सवलतीव्यतिरिक्त, इतर अनेक फायदे दिले जात आहेत.
advertisement
पाणी तुंबलेल्या रस्त्यांवर कार चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या टिप्स
किंमत आणि इंजिन
दिल्लीमध्ये Nissan Magniteची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख ते 10.54 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. तसेच, ही कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जनपेक्षा ती 75,000 जास्त महाग आहे. सीएनजी मॉडेलची किंमत 6.89 लाख रुपये आहे. मॅग्नाइट सीएनजीच्या मायलेजबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, परंतु शहरात ती 24km/kg मायलेज देऊ शकते अशी अपेक्षा आहे.
Tesla कारच्या 'ऑटो पायलट'ने घेतला एकाच कुटुंबातील 3 जणांचा जीव, नेमकं कुठे चुकलं?
या कारमधील जागा बरीच चांगली आहे, त्यात 5 लोकांसाठी बसण्याची जागा आहे. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी आणि सीट बेल्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. ही एका लहान कुटुंबासाठी चांगली कार आहे. भारतात, ही गाडी थेट हुंडई एक्स्टर आणि टाटा पंचशी स्पर्धा करते. तुम्ही ती दैनंदिन वापरासाठी खरेदी करू शकता.