TRENDING:

ना पेट्रोलची गरज ना डिझेलची! आता सूर्य प्रकाशाने धावेल कार, छतावर असेल सोलर पॅनल

Last Updated:

आता एक भन्नाट कार आली आहे. या कारला पेट्रोल, डिझेल किंवा चार्ज करण्याचीही गरज नाही. Nissan ने सोलर पॅनल असणारी इलेक्ट्रिक कार Ariya ची कॉन्सेप्ट मार्केटमध्ये सादर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जगभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप प्रगत झाली आहे. वाहनांवर नवनवीन प्रयोग केले जात आहेत. सध्या पर्यावरणाचा विचार करुन इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. मात्र असं असतानाच आता कारला आणखी इडव्हान्स करण्याचा प्रयोग केला आहे. हा प्रयोग पर्यावरणाच्या हिशोबानेही चांगला आहे आणि सस्टेनेबलही आहे. जापानची कंपनी Nissan ने आपल्या ऑल-इलेक्ट्रिक SUV Ariya ने ही खास कॉन्सेप्ट सादर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार आता सूर्यप्रकाशाने चार्ज होणार आहे. यासोबतच ही जवळपास 200 किलोमीटरपर्यंत अतिरिक्त रेंजही देऊ शकते. टेक्नॉलॉजीच्या दुनियेत हे भविष्यातील इलेक्ट्रिक कारसाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

चालू गाडीत चार्ज होते बॅटरी 

Nissan Ariya Solar Concept ची ही खास कार आहे. या कारमध्ये छत, बोनटआणि मागच्या भागावर जवळपास 41 वर्ग फूट एरियामध्ये सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. हे पॅनल सूर्यप्रकाशाला वीजेमध्ये रुपांतरीत करते आणि बॅटरी लगेच चार्ज करते.

50 हजार असेल मासिक पगार तर तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? लगेच घ्या जाणून

advertisement

महत्त्वाचं म्हणजे हे सोलर पॅनल दिसतही नाहीत. म्हणजेच कारची डिझाइन एवढी भारी आहे की, या सोलर पॅनलमुळे तिच्या लूकवर काहीच परिणाम होत नाही. या टेक्नॉलॉजीला निसानने नीदरलँड्सची कंपनी IM Efficiency सह मिळून डेव्हलप केले आहे. सोलर सेल्सला कारच्या बॉडीमध्ये अगदी परफेक्ट फिट केलं आहे. जेणेकरुन एयरोडानॅमिक्स आणि डिझाइन दोन्हीही चांगलं दिसेल. याच कारणामुळे ही कॉन्सेप्ट कार दिसालया जवळपास प्रोडक्शन मॉडल Ariya सारखीच दिसते.

advertisement

भविष्यातील ईव्ही टेक्नॉलॉजीची झलक 

निसानचा हा प्रयोग खास आहे कारण कंपनीला हिडन सौर पॅनेल बसवल्याने कारच्या लूक आणि परफॉर्मेंसवर कसा परिणाम होतो हे तपासायचे होते. भविष्यात या टेक्नॉलॉजीमुळे रेंजची चिंता कमी होऊ शकते, कारण कार पार्क केलेली असताना किंवा हालचाल करत असताना बॅटरी चार्ज होत राहील.

Yamahaच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एंट्री! 169 km रेंजसह सर्वच फीचर्स जबरदस्त, किंमत किती?

advertisement

Nissan Ariya: फीचर्स आणि रेंज

निसान आरिया ही कंपनीची सर्वात प्रीमियम आणि प्रगत इलेक्ट्रिक क्रॉसओवर एसयूव्ही आहे. ती 63 kWh ते 87 kWh प्रति तास बॅटरी क्षमतेसह येते, जी एका चार्जवर 600 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. यात निसानची एक्सक्लुझिव्ह e-4ORCE ऑल-व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कूप-शैलीची डिझाइन, आलिशान इंटीरियर, दोन 12.3-इंच डिजिटल स्क्रीन, लेव्हल-2 एडीएएस आणि 360-डिग्री कॅमेरा यासारख्या अडव्हान्स फीचर्सचा समावेश आहे.

advertisement

भारतात लॉन्च होऊ शकते का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

Nissan Ariya ची भारतामध्ये टेस्टिंग पहिलेच पाहिली आहे. भविष्यात ही भारतात लॉन्च झाली तर या कारची किंमत जवळपास 60 लाख ते 80 लाखांपर्यंत असु शकते. सोलर पॅनलसारखी टेक्नॉलॉजी प्रोडक्शन मॉडलपर्यंत पोहोचली तर ही भारतीय ईव्ही बाजारासाठी गेम-चेंजर ठरु शकते.

मराठी बातम्या/ऑटो/
ना पेट्रोलची गरज ना डिझेलची! आता सूर्य प्रकाशाने धावेल कार, छतावर असेल सोलर पॅनल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल