TRENDING:

आता बिनधास्त घ्या जुनी गाडी, फसवणुकीचं टेन्शनच नाही, RTO चा मोठा निर्णय

Last Updated:

Old Vehicles Selling: सध्याच्या काळात जुन्या वाहनांच्या खरेदीकडे कल वाढत आहे. आता फसवणूक टाळण्यासाठी पुणे आरटीओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सध्याच्या काळात नव्या वाहनांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्यामुळे काहीजण जुन्या वाहनांच्या खरेदीस प्राधान्य देतात. परंतु, खरेदी-विक्रीत होणाऱ्या फसवणुकीचं अनेकांना टेन्शन असतं. त्यामुळे अशा वाहनांची खरेदी टाळली जाते. आता मात्र जुने वाहन विक्री किंवा खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही. याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) मोठा निर्णय घेतलाआहे. आता जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे.
Old Vehicle: आता बिनधास्त घ्या जुनी गाडी, फसवणुकीचं टेन्शनच नाही, RTO चा मोठा निर्णय
Old Vehicle: आता बिनधास्त घ्या जुनी गाडी, फसवणुकीचं टेन्शनच नाही, RTO चा मोठा निर्णय
advertisement

पुण्यात जुन्या वाहनांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच शहर परिसरात जुनी वाहन खरेदी-विक्री करणारे हजारो छोटे-मोठे विक्रेते आहेत. परंतु, अशा वाहनांच्या खरेदी-विक्रीत फसवणुकीचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी पुणे आरटीओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जुन्या वाहन विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन खरेदी आणि विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच जुन्या वाहन खरेदी आणि विक्री करताना होणारी फसवणूक टळणार आहे.

advertisement

बीडमध्ये मुंडेंची फसवणूक, आता पुढे आला वेगळाच घोटाळा, नेमकं काय झालं?

कशी होते फसवणूक?

एखाद्या व्यक्तीने विक्री सेंटरला वाहन दिल्यानंतर ते पुढे दुसऱ्या व्यक्तीला विकले जाते. पण, बऱ्याचदा ते खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केले जात नाही.

कधी-कधी वाहन मालकाने विक्रीसाठी एनओसी दिलेली असते. पण, ते वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरच केलेले नसते.

advertisement

वाहन विक्री झालेले असते आणि ते वाहन दुसराच व्यक्ती वापरत असतो. त्यामुळे फसवणूक होत असते.

अशी फसवणूक टाळण्यासाठी पुणे आरटीओने जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना आता अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात वर्षाला कोट्यवधींची उलाढाल

पुण्यात दरवर्षी हजारो वाहनांच्या खरेदी – विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, त्यानंतर जुन्या वाहन खरेदी-विक्रीमध्ये अनेक अडचणी येतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी पुणे आरटीओने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची होणारी फसवणूक, अडचणी दूर करण्यासाठी आरटीओकडून अधिकृत परवाना देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले.

advertisement

परवान्यासाठी करावा लागेल अर्ज

आरटीओकडे 29 ए नुसार अर्ज केल्यानंतर आरटओकडून 29 बी नुसार अधिकृत विक्रीचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे या वाहन विक्रेत्यांनी मालकाकडून वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची मालकी स्वत:च्या सेंटरच्या नावे करता येणार आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
आता बिनधास्त घ्या जुनी गाडी, फसवणुकीचं टेन्शनच नाही, RTO चा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल