Success Story : पशुवैद्यकीय डॉक्टर झाला पशुपालक, 65 पाळल्या गायी, महिन्याला 3 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
पशुवैद्यकीय डॉक्टर झाल्यावर रोहन यांनी 4 वर्षांपूर्वी 5 गाईंपासून पशुपालनास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात जवळपास 65 पेक्षा अधिक गाई असून दूध विक्रीतून महिन्याला तीन लाख ते साडेतीन लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावात राहणाऱ्या 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर रोहन भोईटे यांची आज आपण यशोगाथा पाहणार आहोत. पशुवैद्यकीय डॉक्टर झाल्यावर रोहन यांनी 4 वर्षांपूर्वी 5 गायीपासून पशुपालनास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात जवळपास 65 पेक्षा अधिक गायी असून दूध विक्रीतून महिन्याला तीन लाख ते साडेतीन लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. या संदर्भात अधिक माहिती यशस्वी पशुपालक रोहन भोईटे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
कौठाळी येथील तरुण पशुवैद्य डॉक्टर रोहन तानाजी भोईटे यांनी 2022 मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर बनल्यावर 5 गायी आणून पशुपालनास सुरुवात केली. पशुपालन करत असताना हळूहळू आवड निर्माण होत गेली. आज रोहन भोईटे यांच्या गोठ्यात 65 गायी आणि 20 कालवड आहेत. दररोज गाईंना सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळ चारा दिला जातो.
advertisement
वेळोवेळी पाणी पिण्यासाठी दिले जाते. मुरघास, ओला चारा, सुका चारा दिला जातो. तर दररोज गायीपासून सकाळ आणि संध्याकाळी या दोन वेळेत 65 गायीपासून 650 लिटर दूध मिळत आहे. तर गायीपासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून पशुवैद्य डॉक्टर रोहन भोईटे या महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
गायीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच रोहन यांनी साडेबारा लाख रुपयांचा शेड उभा केला आहे. गायीची देखभाल, त्यांचा चारापाणी आणि गोठ्याच्या स्वच्छतेसाठी बाहेरील कामगार कोणीही नसून सर्वजण घरातील लोक करत आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वाटचाल करावी. लहान का असेना व्यवसाय असू द्या पण व्यवसाय करा, नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न व्यवसायातून मिळेल, असा सल्ला 26 वर्षीय उच्चशिक्षित तरुण रोहन भोईटे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 12, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पशुवैद्यकीय डॉक्टर झाला पशुपालक, 65 पाळल्या गायी, महिन्याला 3 लाख कमाई









