साऊथ सिनेमीतील ही सुंदरी आहे प्रोफेशनल पायलट, विमान उडवण्याचं लायसन्स असलेली एकमेव अभिनेत्री कोण? रजनीकांत-कमल हसनसोबत केलंय काम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर ही साऊथ अभिनेत्री आहे, जिने सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासोबत ही सिनेमात काम केलं आहे आणि लोकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली आहे.
चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या अभिनेत्रींच्या बाबतीत आपलं एक ठराविक मत असतं. ग्लॅमर, अभिनय आणि प्रसिद्धी. पण याच लखलखत्या विश्वातील एक अशी नायिका आहे, जी ना फक्त अभिनेत्री आहे. तर ती एक पायलट देखील आहे. ती या चंदेरी दुनियेतील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिच्याकडे विमान उडवण्याचं लायसन्स देखील आहे. आता हे वाचल्यावर तुम्ही नक्कीच त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल.
advertisement
advertisement
तामिळ सिनेसृष्टीत 'थाला' अजित कुमार याच्या विमान उडवण्याच्या छंदाबद्दल आपण सर्वच जाणतो. त्याच्याकडे पायलट लायसन्स आहे आणि तो ड्रोन प्रोजेक्ट्सवरही काम करतोय. पण या पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात एका भारतीय अभिनेत्रीने कित्येक वर्षांपूर्वीच आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे माधवी.
advertisement
1976 मध्ये अवघ्या 14 व्या वर्षी तेलुगु चित्रपटातून कारकीर्द सुरू करणाऱ्या माधवी यांनी तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा सर्वच भाषांत आपला ठसा उमटवला. कमल हासन यांचा 100 वा चित्रपट 'राजपरवई' असो किंवा 'टिक टिक टिक', माधवी यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. रजनीकांत यांच्यासोबतच्या 'दिल्लू मुल्लू' मुळे त्या घराघरात पोहोचल्या. अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'एक दुजे के लिए' मधील त्यांच्या भूमिकेचे आजही कौतुक होते.
advertisement
अभिनयाच्या शिखरावर असताना माधवी यांनी 1996 मध्ये व्यावसायिक राल्फ शर्मा यांच्याशी लग्न केले आणि त्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्या. सिनेसृष्टीला निरोप दिल्यानंतरही त्यांच्यातील 'काहीतरी वेगळं' करण्याची जिद्द शांत बसली नव्हती. त्यांना लहानपणापासूनच विमान उडवण्याचे आकर्षण होते. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी विमान चालवण्याचे अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण केले. केवळ छंद म्हणून नाही, तर सर्व तांत्रिक गोष्टी आत्मसात करून माधवी यांनी अधिकृत 'पायलट लायसन्स' प्राप्त केले. आज माधवी 'सिंगल इंजिन'चे छोटे विमान चालवतात. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, "जेव्हा मी आकाशात विमान उडवते, तेव्हा मला खऱ्या स्वातंत्र्याचा आणि आत्मविश्वासाचा अनुभव येतो."
advertisement
रजनीकांत यांच्या 'अधिसयप परवी' चित्रपटातील त्यांची 'रंभा' ही भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. सध्या त्या पती आणि तीन मुलींसह अमेरिकेत सुखी संसार करत आहेत. सिनेसृष्टीपासून 27 वर्षे दूर राहूनही, एक यशस्वी व्यावसायिक आणि धाडसी पायलट म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अधिकृत पायलट लायसन्स असलेल्या मोजक्या भारतीय अभिनेत्रींमध्ये माधवी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
advertisement







