'स्वतःबद्दल खोटं...', एकीकडे अरिजीतची रिटायरमेंट, दुसरीकडे प्रसिद्ध संगीतकाराची पोस्ट VIRAL; असं का म्हणाला?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arijit Singh retirement: अरिजीतने या निर्णयावर मौन पाळलं असलं, तरी त्याच्या या एक्झिटवर प्रसिद्ध संगीतकार आणि गायकाने शेअर केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
विशालने लिहिलंय, "यश मिळालं म्हणजे तुम्हाला मानसिक शांती मिळेलच, याची कोणतीही गॅरंटी नसते. पैसा आणि प्रसिद्धी तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. आयुष्य खूप विचित्र आणि लहान आहे. तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. स्वतःशी स्वतःबद्दल खोटं बोलू नका. आयुष्य जगायला शिका... मी तुम्हाला देऊ शकणारा हाच एकमेव सल्ला आहे."
advertisement
advertisement
advertisement
अरिजीतसारखा कलाकार जेव्हा शिखरावर असताना निवृत्ती घेतो, तेव्हा त्यामागे केवळ त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा असतो की इंडस्ट्रीतील वाढता मानसिक ताण? विशालची पोस्ट याच अस्वस्थतेकडे लक्ष वेधत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कलाकार जेव्हा यशाच्या मागे धावताना स्वतःला हरवून बसतो, तेव्हा त्याला अशा कठोर निर्णयाची गरज भासते, हेच विशालला सुचवायचं असावं.
advertisement
अरिजीत सिंग गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 'तुम ही हो' पासून सुरू झालेलं त्याचं करिअर आता थांबलं असलं, तरी त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. विशाल ददलानी, सोना महापात्रा यांसारख्या कलाकारांच्या प्रतिक्रिया पाहता, अरिजीतचा हा निर्णय बॉलिवूडच्या साचेबद्ध संगीत पद्धतीला दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.









