Success Story : पगारात घरखर्च भागत नव्हता, शिक्षकानं सुरू केला बिर्याणी व्यवसाय, महिन्याला लाखभर कमाई
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
समीर दिघे यांनी शिक्षकाची नोकरी सांभाळत बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून ते महिन्याकाठी लाखभर रुपयांची कमाई करतात.
पुणे : पुण्यातील निगडी परिसरात राहणारे समीर दिघे हे शिक्षक आहेत. ते एका नामांकित शाळेत नोकरीही करतात. मात्र फक्त नोकरीच्या पगारावर घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सांभाळत त्यांनी बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून ते महिन्याकाठी लाखभर रुपयांची कमाई करतात. त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
समीर दिघे पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र पगारात घरखर्च भागत नसल्याने त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधला. त्यांच्या आई घरून बिर्याणी बनवून विकत असल्याने समीर यांनी हा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा छोटा स्टॉल सुरू केला. हा स्टॉलच त्यांच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आज या स्टॉलमधून समीर दिघे महिन्याला सुमारे लाखभर रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
शिक्षकाची नोकरी सांभाळून व्यवसाय
समीर दिघे हे नोकरीवरून आल्यानंतर स्वतःचा बिर्याणी स्टॉल चालवतात. त्यांच्या स्टॉलवर हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, कोलकत्ता बिर्याणी अशा विविध प्रकारच्या बिर्याण्या मिळतात. बिर्याणी ते स्वतःच बनवतात. त्यांचा मधुकर पवळे ब्रिज जगदंब होममेड बिर्याणी हा स्टॉल क्रमांक 29, निगडी येथे आहे. कमी किमतीत जास्त क्वांटिटी मिळत असल्याने या स्टॉलला नागरिकांची मोठी गर्दी असते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 12, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : पगारात घरखर्च भागत नव्हता, शिक्षकानं सुरू केला बिर्याणी व्यवसाय, महिन्याला लाखभर कमाई








