TRENDING:

Royal Enfield करणार लवकरच मोठा धमाका, आणतेय पॉवरफुल Bullet 650, किंमत असेल इतकी!

Last Updated:

आता लवकरच रॉयल एनफील्ड एक ६५० सीसी व्हेरियंटमध्ये एक पॉवरफुल बुलेट लाँच करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दणकट आणि मजबूत अशी बाईक तयार करणारी  रॉयल एनफील्डची बुलेटही मागील अनेक वर्षांपासून आपलं वर्चस्व मार्केटमध्ये कायम राखून आहे. रॉयल एनफील्डने आतापर्यंत ३५० सीसी ते ६५० सीसी सेगमेंटमध्ये अनेक अशा बाईक लाँच केल्या आहेत. आता लवकरच रॉयल एनफील्ड एक ६५० सीसी व्हेरियंटमध्ये एक पॉवरफुल बुलेट लाँच करणार आहे.  ही बुलेट क्लासिक 650 ट्विनपेक्षा खाली असणार आहे.
News18
News18
advertisement

Royal Enfield Bullet 650 ही बाईक ६४७.९५ सीसी पॅरलल-ट्विन इंजिनसह येणार आहे. जी कंपनीच्या इतर मॉडेलपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. Royal Enfield Bullet 650 मध्ये  ४७ हॉर्सपॉवर आणि ५२.३ एनएम टॉर्क जनरेट करेल इतकं पॉवरफुल इंजिन असणार आहे. हे इंजिन स्लिपर क्लचसह सहा-स्पीड गिअरबॉक्ससह येणार आहे.  रॉयल एनफील्ड नेहमी क्लासिक असा लूक बाईकला देत आलं आहे, हाच क्लासिकपणा या बाइकमध्ये असणार आहे.

advertisement

किंमत किती असेल?

अमेरिका आणि युके सारख्या परदेशी बाजारपेठेत, Royal Enfield Bullet 650  ही बाईक आधीच कॅनन ब्लॅक आणि बॅटलशिप ब्लू सारख्या रंगांमध्ये विक्रीला उपलब्ध आहे आणि भारतीय नवीन रंगात लाँच होणार आहे.  Royal Enfield Bullet 650  ची किंमत सुमारे ३.६० लाख (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. Royal Enfield Bullet 650 मध्ये नेहमीसारखी पिनस्ट्राइप्ससह रुंद आणि गोलाकार इंधन टाकी आहे, तर क्रोम मडगार्ड जुन्या जनरेशनच्या बुलेटचा लूक देईल. आयकॉनिक पायलट लॅम्प देखील नेहमीसारखा असणार आहे. तसंच. लाईटिंग सेटअपमध्ये एलईडी असेल.

advertisement

Royal Enfield Bullet 650 मध्ये फिचर्स?

Royal Enfield Bullet 650 मध्ये  समोर ३२० मिमी डिस्क आणि मागील बाजूस ३०० मिमी डिस्क ब्रेक असणार आहे. दोन्ही ड्युअल-चॅनेल एबीएस बेस असेल. टायरचा आकार समोर १००/९० आणि मागील बाजूस १४०/७० आहे, ज्यामुळे त्याचा फूटप्रिंट बुलेट ३५० पेक्षा जास्त रुंद होतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
सर्व पहा

Royal Enfield Bullet 650  बाईकचं वजन २४३ किलो आहे, लांबी २.३ मीटरपेक्षा जास्त आहे, ग्राउंड क्लीयरन्स १५४ मिमी आहे आणि सीटची उंची ८०० मिमी आहे. इंधन टाकीची क्षमता १४.८ लिटर आहे. यात स्टील ट्विन-डाउनट्यूब फ्रेम आहे, ज्यामध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स १२० मिमी ट्रॅव्हल देतात आणि रियर ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स ९० मिमी ट्रॅव्हल देतात. ही बाईक १९-इंच फ्रंट आणि १८-इंच रियर क्लासिक व्हील्सवर येईल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield करणार लवकरच मोठा धमाका, आणतेय पॉवरफुल Bullet 650, किंमत असेल इतकी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल