TRENDING:

600 किमी रेंज, शानदार लूक, मार्केटमध्ये येतेय लवकरच 7 सीटर SUV, पहिली झलक समोर

Last Updated:

Skoda लवकरच भारतात आपली एक दमदार अशी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एससूव्ही Vision 7S या कॉन्सेप्ट कारवर तयार झाली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Skoda लवकरच भारतात आपली एक दमदार अशी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एससूव्ही Vision 7S या कॉन्सेप्ट कारवर तयार झाली आहे. Peaq असं नाव स्कोडाने या एसयूव्हीला दिलं आहे.  Peaq  एसयू्ही ही मर्सिडीज-बेंझ GLB आणि Peugeot e-5008 ला टक्कर देईल.  नवीन स्कोडा Peaq ही चेक ऑटोमेकरची सर्वात महागडी कार असणार आहे. ही  SUV 2026 च्या उन्हाळ्यात जगभरात एकाच दिवशी लाँच केली जाईल.

advertisement

स्कोडा Peaq EV मध्ये वेगळं काय? 

स्कोडाने मागील वर्षी भारतात झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये Vision 7S कॉन्सेप्ट एसयूव्हीची झलक दाखवली होती. आता 2027 मध्ये ही एसयूव्ही लाँच होणार आहे. Peaq  ची लांबी  4.9 मीटर इतकी आहे. रेडी स्कोडा Peaq च्या केबिनमध्ये लेदर-फ्री अपहोल्स्ट्रीसारख्या सस्टेनेबल मटेरियल्सचा वापर केला जाऊ शकतो.

बॅटरी आणि रेंज किती? 

advertisement

स्कोडाने दाखवलेल्या कॉन्सेप्टमध्ये 89kWh बॅटरी पॅक होता, जो WLTP नुसार एकदा चार्ज केल्यावर 600 किमी पेक्षा जास्त रेंज देतो, असा दावा कंपनीने केला होता.  Peaq मध्ये 200kW पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. हे RWD (रियर-व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) हे दोन्ही प्रकार असणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टेन्शन घ्यायचं नाही! शरिरावर होता असा परिणाम, अशी घ्या काळजी
सर्व पहा

“Vision 7S सोबत आम्ही स्कोडासाठी नवीन मार्ग खुला केला आहेत, ज्यात ब्रँडला उंचावण्याचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. त्यानंतर आम्ही नवीन डिझाईन लँग्वेज आणले आणि आमच्या प्रोडक्ट आयडेंटिटीला आणखी चांगली केली आहे. आता आम्ही या इनोव्हेटिव्ह व्हेईकल कॉन्सेप्टला प्रत्यक्षात आणत आहोत. आमचा नवीन फ्लॅगशिप मॉडेल आमच्या ब्रँडच्या स्पेशियसनेस आणि प्रॅक्टिकलिटीला एका नवीन पातळीवर घेऊन जाईल. आजपासून, स्कोडाच्या इलेक्ट्रिक फ्युचरसाठी आमचा बोल्ड व्हिजन एका नावासोबत आहे Peaq, जे आमचा हा मॉडेल आमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठे आहे' असा विश्वास  स्कोडा ऑटोचे सेल्स आणि मार्केटिंग बोर्ड सदस्य मार्टिन जान यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
600 किमी रेंज, शानदार लूक, मार्केटमध्ये येतेय लवकरच 7 सीटर SUV, पहिली झलक समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल