TRENDING:

Toyota ची Car निघाली टँकसारखी मजबूत, हायवेवर विमान कारवर कोसळलं; सगळे सेफ!

Last Updated:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, विमान हे Toyota Camry च्या छतावर कोसळलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही वर्षांपासून कार किती दणकट आणि मजबूत आहे, याचे सेफ्टी रेटिंग चेक करून कार खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कार उत्पादक कंपन्या सुद्धा आता कारच्याा सेफ्टी टेस्ट करूनच गाड्या लाँच करत आहे. अशातच जगभरात लोकप्रिय टोयोटा कंपनीच्या Toyota Camry कारच्या सेफ्टीबद्दल चर्चा रंगली आहे. हायवेवर अचानक एक विमान ईमर्जन्सी लँड झालं आणि ते थेट Toyota Camry वर कोसळलं. पण, या कारला आणि कारमधील प्रवाशांना काहीच झालं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

ही घटना घडली अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये. एक २ सीटर विमानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे हे विमान अचानक खाली आलं. विमान चालकाने हे विमान लँड करण्यासाठी हायवे निवडला. हायवेवर इमर्जन्सी लँडिंग केली. त्यावेळी हायवेवर वाहनांची गर्दी होती. अशातच हे विमान Toyota Camry वर कोसळलं. विमान जसं कोसळलं तसं Toyota Camry च्या चालकाने ब्रेक मारला आणि काही अंतरावर जाऊन थांबला. Toyota Camry सोबतच विमान सुद्धा थांबलं.

advertisement

FAA म्हणजे फेडरल एविएशन अडमिनिस्ट्रेशन ने सांगितलं की, Beechcraft 55 नावाचं हे हलकं विमान होतं. उड्डाण भरल्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. पायलटने रेडिओवरून विमानाच्या इंजिनमध्ये काही तरी बिघाड झाला आहे अशी माहिती दिली. त्याने लगेच विमान हे हायवे I-95 वर ईमर्जन्सी लँडिंग केलं. विमान चालकाने कोणत्याही गाडीवर विमान कोसळू नये याची काळजी घेतली पण हायवेवर अचानक हे विमान धावत्या 2023 Toyota Camry  वर कोसळलं.

advertisement

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, विमान हे Toyota Camry च्या छतावर कोसळलं होतं. त्यानंतर Toyota Camry च्या छताचं आणि मागील भागाचं नुकसान झालं. या कारमध्ये  57 वर्षीय चालकाला किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तर विमान चालक २७ वर्षीय तरुणही सुरक्षित होता. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

advertisement

Toyota Camry कशी आहे? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

जपानी कंपनी Toyota ची Toyota Camry  ही एक हायब्रिड सेडान कार आहे.  Toyota Camry  मध्ये ADAS सिस्टम, लेन असिस्ट,  क्रूझ कंट्रोल,  व्हेंटिलेटेड सीट, वायरलेस चार्जर, 12.3-इंच टचस्क्रीन, JBL साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, सनरूफ आणि 9 एअरबॅग सारखे फिचर्स दिले आहे.  टोयोटाच्या गाड्या नेहमी आरामदायक आणि मजबूत म्हणून ओळखल्या जातात. भारतात सुद्धा Toyota Camry मार्केटमध्ये उपलब्ध आहे. नेहमी गाड्यांच्या सुरक्षितेबद्दल बोललं जात असताना Toyota Camry ने कमाल करून दाखवली आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ची Car निघाली टँकसारखी मजबूत, हायवेवर विमान कारवर कोसळलं; सगळे सेफ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल