अशी राहिली केळीची आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 511 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 290 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 100 क्विंटल केळीस 4000 ते 5000 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
गुळास चांगला उठाव
राज्याच्या मार्केटमध्ये 3451 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1667 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4150 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 766 क्विंटल गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Success Story : पशुवैद्यकीय डॉक्टर झाला पशुपालक, 65 पाळल्या गायी, महिन्याला 3 लाख कमाई
आल्याच्या आवक स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये 1801 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 697 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3200 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 9 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 5020 ते 6020 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
तिळास चांगला उठाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 318 क्विंटल तिळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 249 क्विंटल तिळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





