नवीन नॅनो कशी असेल?
नवीन टाटा नॅनो प्रीमियम हॅचबॅकसारखी असण्याची दाट शक्यता आहे, त्यात षटकोनी फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आहेत. अलॉय व्हील्स आणि नवीन रंग पर्याय देखील उपलब्ध आहेत. फक्त ३.१ मीटर लांबी आणि १८० मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह येईल, जेणेकरून गर्दी असलेल्या भागात सहज हाताळता येईल आणि पार्किंगचंही टेन्शन नसेल.
advertisement
६२४ सीसी ट्विन-सिलेंडर पेट्रोल इंजिन
Tata Nano 2025 मध्ये ६२४ सीसी ट्विन-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल. जे सुमारे ३८ पीएस पॉवर आणि ५१ एनएम टॉर्क जनरेट करेल. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन समावेश असेल. भविष्यात टर्बो-पेट्रोल, सीएनजी आणि ईव्ही मॉडेल्स देखील नियोजित आहेत जे २५० किमी पर्यंतची रेंज देऊ शकतात.
काय आहे फिचर्स?
प्रीमियम लूक आणि युटिलिटी एकत्रित करून, या कारमध्ये ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले), डिजिटल ड्रायव्हर क्लस्टर, स्टीअरिंग ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ, यूएसबी, ऑक्स सपोर्ट, पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग समावेश असेल. सनरूफ आणि आरामदायी रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स देखील समावेश आहेत. सुरक्षा फिचर्समध्ये ४ एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स, मागील पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा, मजबूत स्टील बॉडी शेल, सीटबेल्ट रिमाइंडर्स, ईएससी आणि साइड इम्पॅक्ट बीम यांचा समावेश आहे.
किंमत किती?
टाटा नॅनो २०२५ फक्त २.८० लाख रुपयांपासून एक्स-शोरूममध्ये सुरू होते, तर काही सुरुवातीच्या ट्रिम्स सुमारे १.४५ लाख रुपयांना उपलब्ध असू शकतात. ईव्ही व्हेरिएंटची किंमत ५-७ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, टाटा ईएमआय पर्याय देखील देते, ज्यामुळे तुम्ही किमान १,०००-१,५०० रुपयांच्या पेमेंटसह कार खरेदी करू शकता.