Tata Punch EVची ऑन-रोड किंमत काय आहे?
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी नाही तर Tata Punch EV आहे. ही कार 40 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर तुम्हाला 4 वर्षांसाठी दरमहा 25 हजार 395 रुपये ईएमआय द्यावे लागतील आणि त्यासाठी 9.8 टक्के व्याजदर द्यावा लागेल.
ब्रेक फेल झाल्यावर काय करावं? सर्व कार ओनर्सने लगेच घ्या जाणून, होईल फायदा
advertisement
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, कारवर कर्ज घेणे तुमच्या पर्सनल क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. यासोबतच, शहरे आणि डीलरशिपनुसार ऑन-रोड किंमत देखील बदलू शकते.
वाहनाचे स्पेसिफिकेशन आणि इंजिन
टाटा मोटर्सची पंच ईव्ही पॉवरसाठी 25 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक वापरते. कंपनीचा दावा आहे की, हा बॅटरी पॅक एसी चार्जरने 3.6 तासांत 10 ते 100 टक्के आणि डीसी फास्ट चार्जरने 56 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येतो.
बाईकमधील ABS म्हणजे काय? मोटरसायकलमध्ये कशा प्रकारे करते काम
टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर, पंच ईव्ही 315 किमी ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. तसेच, ते ताशी 140 किमीच्या कमाल वेगाने धावू शकते. कंपनीच्या मते, पंच ईव्हीला 0 ते 100 किमी प्रतितास वेग मिळविण्यासाठी 9.5 सेकंद लागतात.