मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये न्यू जर्सीच्या गार्डन स्टेट पार्कवेवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन कुटुंबियांनी सोमवारी २५ जून रोजी टेस्लावर खटला दाखल केला. कॅम्डेन, न्यू जर्सी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 'चुकीच्या मृत्यू' खटल्यात डेव्हिड ड्रायमन (५४), त्यांची पत्नी मिशेल (५४) आणि त्यांची मुलगी ब्रुक (१७) यांच्या मृत्यूसाठी कारच्या "दोषपूर्ण आणि अत्यंत धोकादायक डिझाइन" ला जबाबदार धरण्यात आलं आहे.
advertisement
टेस्लानं काय म्हटलं?
ब्रुकचा मोठा भाऊ मॅक्स ड्रायमन कारमध्ये नव्हता. मार्केट बंद झाल्यानंतर एलोन मस्क आणि टेस्ला यांनी टिप्पणीसाठी केलेल्या विनंत्यांना त्वरित प्रतिसाद दिला नाही. वकिलांनीही अशाच प्रकारच्या विनत्यांना त्वरित प्रतिसाद दिला नाही.
टेस्लाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
टेक्सासमधील ऑस्टिन इथं असलेल्या मस्कच्या कंपनीला त्यांच्या सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबद्दल बऱ्याच काळापासून प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. टेस्लानं म्हटलं आहे की, त्यांचे फिचर्स पूर्णपणे चांगले आहे आणि ते ड्रायव्हर्ससाठी आहेत ज्यांना स्टीअरिंग व्हीलवर हात ठेवावा लागतो आणि ही फिचर्स आता त्यांच्या वाहनांना स्वायत्त बनवत नाहीत.
ऑटोपायलट मोड किती सुरक्षित?
नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली, टेस्लाने डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेतील २० लाखांहून अधिक वाहनं परत मागवण्यास सहमती दर्शविली होती. जेणेकरून त्यांच्या ऑटोपायलट अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम (ADAS) मध्ये सुरक्षा उपाय जोडले जातील. वृत्तानुसार, १४ सप्टेंबर २०२४ रोजी ड्रायमन कुटुंब एका संगीत महोत्सवातून परत येत असताना, न्यू जर्सीच्या वुडब्रिज टाउनशिपमध्ये त्यांची मॉडेल एस कार रस्त्यावरून खाली उतरली आणि एका साइनबोर्ड, रेलिंग आणि काँक्रीट ब्रिज सपोर्टला धडकली.
कसा झाला अपघात?
कारच्या सदोष डिझाइनमुळे ती तिच्या प्रवासाच्या लेनपासून दूर गेली आणि आपत्कालीन ब्रेकिंग लागू करण्यात अयशस्वी झाली, ज्यामुळे अपघात झाला. टेस्लाने गाडी चालवणाऱ्या डेव्हिड ड्रायमनला त्याची मॉडेल एस असुरक्षित असल्याची चेतावणी दिली नाही, असंही या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तक्रारीनुसार, ड्रायमन कुटुंबाने सीट बेल्ट सुद्धा लावले नव्हते.