फीचर्स, सेफ्टी आणि इंजिन
टाटा नेक्सॉन देशातील सर्वात सेफ सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. जिला GNCAP आणि BNCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. ही सेफ्टीसाठी 6 एयरबॅग्स, ESP, 360° कॅमेरा, TPMS आणि ADAS फीचर्स (AEB, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉनिंग आदी) मिळते. ग्राहक ही 1.2L टर्बो पेट्रोल (120 PS) आणि 1.5L टर्बो डिझेल (115 PS) सह सीएनजी ऑप्शनमध्ये खरेदी करु शकतात.
advertisement
ट्रान्समिळन ऑप्शनमध्ये MT,AMT आणि DCA चा समावेश आहे. मायलेजविषयी बोलायचं झाल्यास, पेट्रोलमध्ये ती 17.44 kmpl आणि डिझेलमध्ये 24.08 kmpl पर्यंत (ARAI) ची फ्यूल एफिशियन्स देण्यासाठी सक्षम आहे. फीचर्समध्ये ड्यूअल 10.25 इंच स्क्रीन, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, JBL ऑडिओ, वायरलेस चार्जर, iRA कनेक्टेड टेक आणि प्रीमियम इंटीरियर आहे.
Car AC गार हवा देत नाहीये? फक्त 5 मिनिटात असे स्वच्छ करा वेंट्स, कार होईल गारेगार
Tata Punch
सेलच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर टाटा पंच आहे. या कारला गेल्या महिन्यात 18,748 नवीन ग्राहक मिळाली. हा आकडा फेब्रुवारी 2025 मध्ये विक्री झालेल्या पंचच्या एकूण 14,559 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर आलेल्या 29 टक्क्यांची शानदार वाढ दर्शवतो.
Hyundai Creta
या लिस्टमध्ये ह्युंदाई क्रेटा तिसऱ्या स्थानावर आहे. या लोकप्रिय एसयूव्हीने गेल्या महिन्यात 17,938 नवीन ग्राहक जोडले. फेब्रुवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 16,317 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा वर्षानुवर्षे 10 टक्के वाढ दर्शवतो.
'या' जबरदस्त SUV वर मिळतंय 1.81 लाखांचं डिस्काउंट! देते 17KM मायलेज
Maruti Suzuki Brezza
ब्रेझाच्या विक्रीतही वाढ झाली. गेल्या महिन्यात एकूण 17,863 नवीन ग्राहक जोडले गेले. फेब्रुवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 15,392 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा वर्षानुवर्षे 16 टक्के वाढ दर्शवतो.
Mahindra Scorpio
सेलमध्ये वाढीमुळे स्कॉर्पियोने टॉप-5 एसयूव्हीच्या लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. गेल्या महिन्यात याची एकूण 14,665 यूनिट विकले गेले आहेत.हा आकडा फेब्रुवारी 2025 मध्ये विकलेल्या याच्या एकूण 13,618 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर आलेल्या 8 टक्क्यांची वाढ दर्शवते.
फेब्रुवारी 2026 मध्ये वर उल्लेख केलेल्या टॉप-5 एसयूव्ही व्यतिरिक्त, गेल्या महिन्यात मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या 13,898 युनिट्स, मारुती सुझुकी व्हिक्टोरिसच्या 13,021 युनिट्स, महिंद्रा थारच्या 11,047 युनिट्स, ह्युंदाई व्हेन्यूच्या 10,494 युनिट्स आणि किआ सेल्टोसच्या 10,308 युनिट्स विकल्या गेल्या.
