TRENDING:

गाड्यांच्या On-Road Price आणि Ex-Showroom प्राइजमध्ये फरक काय? याचा किती परिणाम होतो?

Last Updated:

Difference Between On-Road Price And Ex-Showroom Price: कार, ​​बाईक किंवा स्कूटरची किंमत काही वेगळीच सांगितली जाते. परंतु ही वाहने खरेदी करताना ही किंमत वाढते. हे का घडते जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
On-Road Price And Ex-Showroom Price: वाहनांची एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत खूप वेगळी आहे. जेव्हा तुम्ही कार, बाईक किंवा स्कूटरची जाहिरात पाहता तेव्हा त्या वाहनाची किंमत त्याची एक्स-शोरूम किंमत असते. पण जेव्हा तुम्ही तेच वाहन खरेदी करण्यासाठी दुकानात जाता तेव्हा तुम्हाला त्या गाडीची किंमत वाढलेली आढळते. यामागील कारण म्हणजे वाहनांच्या खरेदीवर अनेक प्रकारचे कर आकारले जातात, ज्यामुळे किंमतीत वाढ होते. या मूल्याला वाहनाची ऑन-रोड किंमत म्हणतात.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतीत काय फरक आहे?

वाहनाची ऑन-रोड किंमत ही एक्स-शोरूम किमतीत रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन टॅक्स आणि इन्शुरन्स फीस असे विविध कर जोडल्यानंतर ग्राहकांना सादर केलेले अंतिम बिल असते. या करांव्यतिरिक्त, जर तुम्ही डीलरला तुमच्या वाहनात इतर कोणतेही फीचर जोडण्यास सांगितले, तर त्या फीचरची किंमत देखील कारच्या ऑन-रोड किमतीत जोडली जाते. यामुळे, एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत यामध्ये हजारो ते लाखो रुपयांचा फरक आहे. महागड्या गाड्यांमध्ये हा फरक कोट्यवधी रुपयांपर्यंत जातो.

advertisement

Car Tips: दिवसभर कारमध्ये AC वापरला तरी मायलेज मिळेल 40 किमी, हा आहे फॉर्म्युला!

हे टॅक्स ऑन-रोड किमतीत जोडले जातात

ऑन-रोड किमतीचा सर्वात मोठा घटक म्हणजे वाहनाची एक्स-शोरूम किंमत. एक्स-शोरूम किंमतीमध्ये वाहनाचा उत्पादन खर्च आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) समाविष्ट आहे. डीलरला मिळणारा नफा हिस्सा देखील वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीत समाविष्ट असतो.

advertisement

रजिस्ट्रेशन चार्ज

कोणतेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला ते वाहन आरटीओमध्ये नोंदणीकृत करावे लागेल. सर्व वाहनांचा नोंदणी क्रमांक वेगळा असतो. वाहनासाठी हा यूनिक नंबर मिळाल्यानंतर, रजिस्ट्रेशन फी जमा करावे लागेल. ही फी कारच्या एक्स-शोरूम किमतीत जोडली जाते. वेगवेगळी राज्ये वाहनांच्या खरेदीवर वेगवेगळे रजिस्ट्रेशन फी आकारतात, त्यामुळे राज्यानुसार वाहनाच्या किमतीत फरक असतो.

advertisement

Maruti आता Tata ला देणार दे धक्का, आणतेय अशी SUV, मायलेजची चिंताच मिटेल!

रोड टॅक्स

रोड टॅक्स हा कोणत्याही वाहनासाठी एक-वेळचा टॅक्स आहे. हा टॅक्स भरल्यानंतरच तुम्हाला ते वाहन भारतातील रस्त्यांवर चालवण्याची परवानगी आहे. सर्व वाहनांसाठी रोड टॅक्सचा दर वेगळा असतो. हे वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीवर अवलंबून असते.

ग्रीन टॅक्स

advertisement

ग्रीन टॅक्सला प्रदूषण कर आणि पर्यावरण कर असेही म्हणतात. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वाहनांवर हा कर लावला जातो. महाराष्ट्र सरकारने 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या खाजगी वाहनांवर ग्रीन टॅक्स लादला आहे. तर व्यावसायिक वाहनांमध्ये, हा कर आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर लावला जात आहे.

Tax Collected At Source (TCS)

टीसीएस हा चार्ज हा विक्रेत्याकडून आकारला जाणारा चार्ज आहे. हा चार्ज एक्स-शोरूम किमतीच्या 1 टक्के आहे.

इन्शुरन्स

कोणत्याही वाहनाच्या खरेदीवर विमा काढला पाहिजे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे, वाहन चोरी, अपघात किंवा कोणत्याही अनुचित घटनेत तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता.

फास्टॅग आणि कार लोनमुळे खर्च वाढतो

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

या करांव्यतिरिक्त, नवीन कार, बाईक किंवा स्कूटर खरेदी केल्यावर इतर अनेक प्रकारचे कर देखील आकारले जातात. तुम्ही कार लोनद्वारे कार खरेदी केली तर त्या कर्जावर आकारले जाणारे व्याज ऑन-रोड किंमत वाढवते. वाहन खरेदी केल्यानंतरही, तुम्ही कोणत्याही महामार्गावरून किंवा एक्सप्रेसवेवरून प्रवास केलात, तरीही तुम्हाला फास्टॅगद्वारे टोल टॅक्स भरावा लागेल.

मराठी बातम्या/ऑटो/
गाड्यांच्या On-Road Price आणि Ex-Showroom प्राइजमध्ये फरक काय? याचा किती परिणाम होतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल