कारच्या मागच्या काचेवर असलेल्या या रेषांचाही फायदा आहे. त्याचाही वापर केला जातो. कदाचित अनेकांना हे माहिती नसेल. हिवाळ्यात तर या रेषा खूपच फायद्याच्या आहेत. यामुळे कित्येक जीव वाचण्यात मदत होते. आता ते कसं ते सविस्तर पाहुयात.
गाव असो की शहर, डोंगर असो की मैदान! 23 वर्षे या कारला कुणी टक्कर देऊ शकलं नाही; आता नव्या अवतारात
advertisement
या लाइन्स खरंतर डिफॉगर आहेत. थंडीच्या मोसमात पडणारं धुकं लक्षात घेऊन या रेषा बनवण्यात आल्या आहेत. दाट धुक्यामुळे ड्रायव्हरला मागचं काही दिसत नाही. यामुळे अपघाताचाही धोका असतो. आता चालक किंवा कोणताही प्रवासी गाडीतून पुन्हा पुन्हा बाहेर पडून काच साफ करू शकत नाही. अशा परिस्थितीत ही डिफॉगर लाइन चालकाला मदत करते. केवळ या डिफॉगर लाइनच्या मदतीने चालकांना त्यांच्या मागून येणारी वाहनं पाहता येतात.
आता याचा वापर कसा करायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ड्रायव्हर डिफॉगर लाइन चालू करून विंडशील्डमधून धुकं काढून टाकतो. फक्त काही सेकंदात, ड्रायव्हर फक्त एक बटण दाबून विंडशील्डमधून धुकं साफ करू शकतो. आता फक्त एक बटण दाबून काच एका क्षणात कशी साफ करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी गाडीत डिफॉगर स्विच असतो. तो चालू केल्यावर या रेषा गरम होतात कारण त्या धातूपासून बनवलेल्या आहेत. यामुळे काचेवर काचेवर साचलेले पाण्याचे थेंब आणि धुकं कोरडं होऊ लागतं. काही वेळातच सर्व पाण्याचे थेंब सुकतात.
मोटारसायकल डिझेलवर का चालत नाही? चुकून डिझेल टाकलं तर काय होईल?
यामुळे ड्रायव्हरला मागचं सर्व स्पष्ट दिसतं आणि अपघात टाळता येतो. साहजिकच यामुळे जीव वाचतात.
