TRENDING:

गुढीपाडव्याला बाइक खरेदी करायचीये? यामाहा देतेय बंपर सूट, होईल हजारोंची बचत

Last Updated:

मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण हे नवं वाहन खरेदी करतात. तुम्हालाही स्कूटर किंवा मोटरसायकल खरेदी करायची असेल तर एक मस्त ऑफर सुरु आहे. चला याविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गुढीपाडव्‍याच्‍या शुभ प्रसंगी इंडिया यामाहा मोटर महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी आपल्‍या लोकप्रिय स्‍कूटर व मोटरसायकल लाइनअपवर अनेक विशेष उत्‍सवी ऑफर्स देत आहे. यामुळे आता ग्राहकांना त्‍यांची आवडती यामाहा विशेष डिस्काउंटसह खरेदी करता येईल आणि स्‍टाइल, कार्यक्षमता व नाविन्‍यतेसह नववर्षाची सुरूवात करता येईल.
यामाहा मोटर
यामाहा मोटर
advertisement

महाराष्‍ट्रात यामाहा मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सवर गुढीपाडवा विशेष ऑफर्स:

यामाहा R15 सिरीजवर ऑफर

70 व्‍या अ‍ॅनिव्‍हर्सरी निमित्त यामाहा मोटर खास ऑफर घेऊन आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही ऑफर दिली जातेय. जेथे ऑन-रोड किमतीवर 6,000 रूपयांची बचत आहे, ज्‍यामुळे ही आयकॉनिक सुपरस्‍पोर्ट खरेदी करण्‍यासाठी अधिक परवडणारी आहे.

यामाहा RayZR 125 Fi Hybrid वर तुम्ही जवळपास 7000 रूपयांची बचत करु शकता. या स्‍कूटरमध्‍ये स्‍पोर्टी डिझाइनसह सर्वोत्तम गोष्टींचे कॉम्बिनेशन आहे.

advertisement

फक्त 1500 रुपयांच्या EMI वर मिळेल ही बाइक! फूल टँकमध्ये चालते 700KM

यामाहा Fascino 125 Fi Hybrid वर डाउन पेमेंट फक्‍त 4,999 रूपयांसह सुरू होणार आहे. ज्‍यामुळे यामाहाची स्‍टायलिश व इंधन-कार्यक्षम स्‍कूटर यंदा सणासुदीच्‍या काळात अधिक परवडणारी झाली आहे.

यामाहा FZ-S Fi Hybrid कमी ईएमआय प्लॅन: डाउन पेमेंट 7,999 रूपयांसह सुरू होण्‍यासह यामाहाची प्रगत हायब्रिड मोटरसायकल खरेदी करा, जी परफॉर्मन्‍स, कार्यक्षमता आणि उत्‍सवी किफायतशीरपणा देते.

advertisement

या विशेष गुढीपाडवा उत्‍सवी ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे महाराष्‍ट्रातील ग्राहकांना यामाहाच्‍या तंत्रज्ञान-संचालित, स्‍टायलिश व कार्यक्षमता-केंद्रित दुचाकी खरेदी करत नववर्ष साजरीकरण करण्‍याची परिपूर्ण संधी आहे.

मध्यमवर्गीयांसाठी बेस्ट आहे Maruti ची ही स्वस्त कार! देते 32km मायलेज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विम्यासाठी तो प्रकार, थांबा! चूक अंगलट येईल, एक रुपायाही सुद्धा भेटणार नाही, Video
सर्व पहा

यामाहाच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम मोटरसायकलींचा समावेश आहे जसे की YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc), Yamaha XSR155 (155cc) आणि FZ series, ज्यामध्ये FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc), आणि FZ-X (149cc) यांचा समावेश आहे. याशिवाय, यामाहा विविध स्कूटर्सची श्रेणी देखील ऑफर करते, ज्यामध्ये Aerox 155 version S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc), आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यांचा समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
गुढीपाडव्याला बाइक खरेदी करायचीये? यामाहा देतेय बंपर सूट, होईल हजारोंची बचत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल