बुलंदशहर, 2 सप्टेंबर : आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून अनेक मुले दिवसरात्र मेहनत करतात. आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आपल्या व्यक्तीगत आयुष्यातही गरुडझेप घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तरुणाीई मेहनत करते. यानंतर अनेक कठीण प्रसंगावर मात केल्यानंतर जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो.
अशा एका तरुणीने आपल्या आई वडिलांच्या कष्टाची, मेहनतीची जाण ठेवत, प्रचंड अभ्यास केला आणि आता या तरुणीने PCS-J या परीक्षेत बाजी मारली. ही वकील तरुणी आता न्यायाधीश होणार आहे. अत्यंत मेहनत आणि कष्ट करत जिद्दीने तिने हे स्वप्न साकार केले आहे. खुशबू धनखड़ असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या या यशानंतर तिचा परिवार तर आनंदी आहेच, पण तिचे परिसरातही कौतुक होत आहे.
advertisement
खुशबू धनखड़ ही उत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहरच्या प्रीत विहार कॉलोनीमधील रहिवासी आहे. तिने उत्तर प्रदेश न्यायिक सेवा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने या परिक्षेत 145 वी रँक मिळवत आपल्या कुटुंबीयांसह जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. खुशबूचे वडील वीरेंद्र सिंह धनखर हे वकील आहेत आणि आई शोभा धनखर गृहिणी आहेत.
PCS-J परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुशबूने सांगितले की, तिने तिचे हायस्कूल आणि बारावीपर्यंतचे शिक्षण डीपीएस स्कूल, बुलंदशहरमधून केले. यानंतर गौतम बुद्ध नगर विद्यापीठ ग्रेटर नोएडामधून बीए एलएलबी आणि नंतर जामिया विद्यापीठ दिल्लीमधून ती एलएलएम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. आज तिने तिच्या या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
यशानंतर खुशबू काय म्हणाली -
ती म्हणाले की, तिच्या आई-वडिलांनी तिला अभ्यासात खूप साथ दिली. आज ती ज्याठिकाणी पोहोचली आहे, ते मी आई-वडिलांमुळेच पोहोचू शकली. लोकांवर होत असलेला अन्याय पाहता, लोकांना न्याय मिळवून देण्याचा मनात ठाम निर्णय घेतला. यासाठी न्यायिक सेवेत जाणे, हा एकमेव मार्ग आहे, असे तिला वाटले. त्यामुळे तेव्हापासून तिने न्यायाधीश होण्याचे ठरवले. अखेर आज ती न्यायाधीश पदापर्यंत पोहोचली आहे.