मथुरा : संपूर्ण देशात यूपीएससी या परिक्षेला अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे त्या परीक्षेचा अभ्यासक्रमही अत्यंत कठीण असतो. व्यापक असतो. त्यामुळे भल्याभल्यांना हे शक्य होत नाही. मात्र, तुम्हालाही वाचून आश्चर्य होईल, एक 7 वर्षांचा मुलगा आहे, जो फक्त यूपीएससी आणि आयआयटीमधील विषय शिकतच नाही तर तब्बल 14 विषय शिकवतो.
advertisement
गुरु उपाध्याय असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो उत्तरप्रदेशातील मुथरा जिल्ह्यातील वृंदावन येथील गौरनगर कॉलनीत राहतो. त्याला गुगल गुरू या नावानेही ओळखले जाते. त्याचे वय फक्त 7 वर्ष आहे. मात्र, त्याची प्रतिभा पाहून भल्याभल्यांना आश्चर्य होते. त्याच्या या कार्यामुळे त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही सर्वात कमी वयाचा लेक्चरर म्हणून विक्रम नोंदवला आहे.
18 महिन्यांचा होता तेव्हाच दिसली प्रतिभा -
गुरूचे वडील अरविंद उपाध्याय यांनी सांगितले की, आम्ही दोघे नवरा बायको सिव्हिल परीक्षेची तयारी करायचो. त्यामुळे घरात नेहमी अभ्यासाचं वातावरण असायचं. या गोष्टी गुरू नेहमी लक्ष देऊन ऐकायचा. एके दिवशी एका न्यूज चॅनेलवर बांग्लादेशची बातमी दाखवली जात होती. मग गुरू तिथल्या राजधानीबद्दल आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टी सांगू लागले. त्यावेळी गुरू फक्त 18 महिन्यांचे होता आणि त्याचवेळी त्याची प्रतिभा कुटुंबीयांच्या लक्षात आली.
कॅन्सरमुळे आईचे निधन, बहिणीनेही सोडली साथ, पण तरी प्राचीनं करुन दाखवलं, Paralympic साठी निवड...
नावामागे काय कहाणी -
अरविंद यांनी पुढे सांगितले की, गुरुचे नाव ठेवण्यामागे एक रंजक कहाणी आहे. अरविंद यांचे मोठे भाऊ यांनी व्यक्ती आपल्या नावानुसार काम करतो, असा विचार करून गुरुचे नाव दिले. त्यामुळे काकांनी दिलेल्या नावाचा अर्थ गुरूने अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केला, असे म्हटले जात आहे.
14 विषयांचे ज्ञान -
गुरूने 2 वर्षांचा असताना संपूर्ण दोन वर्षांच्या चालू घडामोडी, UPSC पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाठ केल्या. याशिवाय गुरूने अनेक कठीण विषयांना 5 वर्षाचा असतानापासून शिकायला सुरूवात केली. गुरू ज्या विषयांचा अभ्यास करायचा. त्यांची एकत्र तुलना केली असता त्याला यूपीएससीच्या 14 विषयांचे ज्ञान असल्याचे दिसून आले. हे विषय तो शिकवूसुद्धा शकतो. याचमुळे त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.
अब्दुल कलाम यांचेसारखा शास्त्रज्ञ व्हायचंय -
इतकेच नव्हे तर गुरूने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. यासोबतच गुरूला देश-विदेशात अनेक ठिकाणी अतिथी व्याख्याता म्हणून बोलावले जाते. भविष्यात मोठे झाल्यावर त्याला त्याचे आदर्श एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे वैज्ञानिक व्हायचे आहे, असे त्याने सांगितले.
