कॅन्सरमुळे आईचे निधन, बहिणीनेही सोडली साथ, पण तरी प्राचीनं करुन दाखवलं, Paralympic साठी निवड...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
असं म्हणतात, जर मनात जिद्द असेल तर व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करतो आणि यश नक्की मिळवतो. असेच एका तरुणीने सिद्ध करुन दाखवली आहे. प्राची यादव असे या तरुणीचे नाव आहे. दिव्यांग खेळाडू प्राची यादव तरुणाईसाठी खऱ्या अर्थाने दिपस्तंभ आहे. जाणून घेऊयात, तिचा प्रेरणादायी प्रवास. (रितिका तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
लोकल18 सोबत बोलताना प्राचीने सांगितले की, त्यांच्या शाळेत स्विमिंग शिकवली जात होती. प्राची ज्या शाळेत शिकत होती, त्याठिकाणी सर्व दिव्यांग मुलांना एक्वा थेरपी दिली जात होती. 2007 मध्ये स्विमिंगपासून प्राचीने स्पोर्ट्स करिअरची सुरुवात केली होती. प्रशिक्षकाकडून कॅनोइंगची माहिती मिळाल्यानंतर प्राचीने ते शिकण्याची उत्सुकता दाखवली.
advertisement
यामुळे मग तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पदकेही जिंकली. प्राचीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले आहे. आता प्राचीची 2024 मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्येही निवड झाली आहे. तसेच या आगामी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवण्याचे तिचे लक्ष्य आहे.
advertisement
बालपणी कॅन्सरमुळे आईचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आणि तिच्या बहिणीने तिचा सांभाळ केला. आईनंतर काही वर्षांनी बहिणीचाही कॅन्सरमुळे मृत्यू झाला. यामुळे प्राची एकटी पडली होती. मात्र, तिने हार मानली नाही. तसेच खेळावर लक्ष्य केंद्रीत करत मेहनत सुरू ठेवली. तिच्या या करिअरमध्ये तिला तिच्या प्रशिक्षकांची चांगली मदत झाली.
advertisement
प्राचीने सांगितले की, सुरुवातीच्या काळात ग्वाल्हेरहून भोपाळ येणे कठीण होते. वडिलांनी नेहमी पाठिंबा दिला. पण काही नातेवाईक वडिलांना बोलायचे. मात्र, तरीही वडिलांनी नेहमी पाठिंबा दिला. त्याचमुळे मी याठिकाणी पोहोचल्याचे तिने सांगितले. प्राचीने तिचे शालेय शिक्षण अमर ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट स्कूलमधून. याठिकाणी सामान्य आणि दिव्यांग मुले एकत्र शिकतात. तिथूनच प्राचीने पोहायला सुरुवात केली.
advertisement
प्राची ही ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे. तिचे बालपण याचठिकाणी गेले. 2007 मध्ये पॅरा स्विमिंगच्या माध्यमातून आपला क्रीडा प्रवास सुरू करणारी प्राचीला तिचे स्विमिंग कोच डॉ. बीके डबास यांनी केनोई कयाकिंगला प्रोत्साहन दिले. यानंतर 2018 मध्ये प्राचीने या खेळात रस दाखवला. फक्त एक वर्षानंतर, प्राचीला पॅरा कॅनोइंग चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये तिने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले.


