या भरती मोहिमेचा उद्देश आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एम्स संस्था आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये नियुक्त्या करणे हा आहे.
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in ला भेट द्या. त्यानंतर “भरती” या सेक्शन मध्ये जा आणि AIIMS CRE 2025 अर्ज लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा. अर्जाचा फॉर्म योग्य तपशीलांसह भरा. तसेच तुमचा फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. आणि शेवटी अर्ज शुल्क भरा.
advertisement
निवड कशी केली जाणार?
या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संगणक-आधारित चाचणी (CBT) द्यावी लागणार आहे. या सीबीटीमध्ये एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतात असणार आहे. तसेच परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
कौशल्य चाचणीमध्ये काय असेल?
कौशल्य चाचणी फक्त काही पदांसाठी घेतली जाणार आहे. व्यावहारिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या पदांसाठी, तुमच्या व्यावहारिक क्षमतांचे मूल्यांकन कौशल्य चाचणी उत्तीर्ण करून केले जाईल. ही चाचणी पात्रता चाचणी असणार आहे.
कागदपत्र पडताळणीमध्ये कशी केली जाणार?
अंतिम निवडीमध्ये CBT स्कोअर, कौशल्य चाचणी कामगिरी आणि मूळ कागदपत्रांद्वारे पात्रता पडताळणीचा विचार केला जाईल. यामध्ये कागदपत्रे पूर्ण आहेत की नाहीत याची तपासणी केली जाते.
