टॅलेंट डिक्रिप्ट ही कंपनी सुरू झाल्यापासून नोकरीच्या भरतीसाठी एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म बनली आहे. विशेषतः कोडिंगमध्ये कुशल तरुणांमध्ये ही कंपनी खूपच लोकप्रिय आहे. कंपनी हॅकाथॉन आणि व्हर्च्युअल कौशल्य मूल्यांकनचे आयोजन करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये व कंपन्यांमध्ये दुवा म्हणून काम करते. टॅलेंट डिक्रिप्टची सिक्युरिटी फीचर्सही चांगली आहेत. उमेदवाराच्या ऑनलाइन मूल्यांकनादरम्यान कोणताही उमेदवार कोणतंही अनधिकृत उपकरण वापरू शकणार नाही, याची खातरजमा ही सिक्युरिटी फीचर्स करतात.
advertisement
एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरु केला
आरुषीने जे.पी. इन्स्टिट्युटमधून बी. टेक आणि एम. टेकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने आयआयटी-दिल्लीत इंटर्नशिप केली. आरुषीला दोनदा एक कोटी रुपयांच्या मोठ्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर आल्या होत्या, मात्र तिने या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. 2018 च्या शेवटी आरुषीने कोडिंग शिकून सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात आरुषीने फक्त एक लाख रुपये गुंतवून टॅलेंट डिक्रिप्ट कंपनी सुरू केली.
अमेरिका, जर्मनीच्या कंपन्या आहेत क्लायंट
आरुषीची कंपनी टॅलेंट डिक्रिप्ट तरुणांना आवडती नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करते. सध्या अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, यूएई, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ या देशांतील 380 कंपन्या आरुषीच्या कंपनीकडून सेवा घेत आहेत. या कंपनीत तरुणांना हॅकाथॉनच्या माध्यमातून व्हर्च्युअल स्किल टेस्ट द्यावी लागते. आरुषीच्या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
