TRENDING:

रिक्षाचालकाच्या मुलाला ISRO कडून आमंत्रण, बंगळुरूला घेणार स्पेशल ट्रेनिंग, देशभरात मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश

Last Updated:

विशेष बाब म्हणजे दुर्गेशचे वडील दिल्लीत ऑटोचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. दोघांचेही शिक्षण हे दहावीपर्यंतही झालेले नाही. मात्र, त्यांच्या मुलाने मोठे यश मिळवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन प्रकाश, प्रतिनिधी
दुर्गेश कुमार आणि त्याची आई
दुर्गेश कुमार आणि त्याची आई
advertisement

सुपौल : इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेसोबत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न होते. मात्र, अगदी काही थोड्या लोकांना ही संधी मिळत असते. यातच आता एका ऑटो ड्रायव्हरच्या मुलाला इस्रोकडून आमंत्रण आहे आहे.

दुर्गेश कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बिहारच्या सुपौल येथील रहिवासी आहे. इस्रोने यंग सायंटिस्ट प्रोग्राम (युविका) अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत दुर्गेश कुमारची निवड झाली आहे. आता तो इस्रोमध्ये 12 दिवसांच्या विशेष प्रशिक्षणासाठी बंगळुरूला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे दुर्गेशचे वडील दिल्लीत ऑटोचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. दोघांचेही शिक्षण हे दहावीपर्यंतही झालेले नाही. मात्र, त्यांच्या मुलाने मोठे यश मिळवले आहे.

advertisement

मागच्या महिन्यात 9 मार्चला इस्रोने ऑनलाइन परीक्षा घेतली. या परिक्षेच्या आधारे देशभरातून एकूण 350 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दुर्गेशने सपूर्ण देशात 252 वा क्रमांक पटकावला आहे. दुर्गेश हा सुपौल जिल्ह्यातील किशनपूर हायस्कूलच्या नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, आता निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना इस्रो विशेष प्रशिक्षण देईल. यासाठी सर्वांना ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे.

advertisement

बंगळुरूत दिले जाणार प्रशिक्षण -

सुपौल जिल्ह्यातील किशनपुर परिसातील अन्दौली वार्ड-06 येथील रहिवासी असलेल्या दुर्गेश कुमार याच्या निवडीनंतर त्याचे वडील राजकुमार चौधरी आणि आई सरिता देवी यांच्यासह संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. याबाबत बोलताना दुर्गेशने सांगितले की, त्याला 12 ते 24 मे दरम्यान बेंगळुरू येथील यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे. त्यासाठी तो 8 मे रोजी सुपौल येथून रवाना होतील.

advertisement

दुर्गेशने सांगितले की, त्याला भविष्यात सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवेत करिअर करायचे आहे. पण यासोबतच त्याला विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनात रस आहे. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमात त्याची उत्सुकता अधिक दृढ झाली तर भविष्यात तो शास्त्रज्ञ होण्याचाही विचार करू शकतो. यासाठी युविकामध्ये निवड झाल्यानंतर तो आता अंतराळ संशोधन जवळून पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

advertisement

गरीबांचं मटण शेतकऱ्यांना करणार श्रीमंत, अशा पद्धतीने करा शेती अन् मग पाहा फायदा..

त्याची आई सरिता देवी यांनी सांगितले की, त्या जास्त शिकलेल्या नसल्याने त्यांना इस्रोबाबत काही जास्त माहिती नव्हती. मात्र, हायस्कूलचे शिक्षक जितेंद्र कुमार यांनी आम्हाला इस्रो आणि या परीक्षेबद्दल सांगितले तेव्हा आम्ही दुर्गेशचा आत्मविश्वास वाढवला. आम्हा पती-पत्नी दोघांनाही शिक्षणाअभावी ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होऊ द्यायचा नाही. त्यामुळे आम्ही आमच्या चारही मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

चार भावंडांमध्ये दुर्गेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची मोठी बहीण सपना ही पदवीधर आहे, तर तिची दुसरी बहीण अंशू हिने यावर्षीची बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर लहान भाऊ अखिलेश सध्या सहाव्या वर्गात आहे.

मराठी बातम्या/करिअर/
रिक्षाचालकाच्या मुलाला ISRO कडून आमंत्रण, बंगळुरूला घेणार स्पेशल ट्रेनिंग, देशभरात मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल