पात्रता काय आहे?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी, उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानात बीई / बीटेक पदवी किंवा किमान 60 % गुणांसह एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, कामाचा अनुभव देखील आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून त्याची सविस्तर माहिती तपासू शकतात.
वयोमर्यादा किती?
advertisement
बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय पदानुसार 55 वर्षांपर्यंत निश्चित केले आहे. उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2024 च्या आधारे मोजले जाईल. त्याच वेळी, राखीव प्रवर्गांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पगार किती दिला जाणार?
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा 60,000 ते 1,73,860 रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया कशी आहे?
या भरतीमध्ये, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (आवश्यक असल्यास), मुलाखतद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क किती आहे?
ऑनलाइन अर्ज करताना सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना जीएसटीसह रु.1000 + रु.180 भरावे लागतील. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना जीएसटीसह 100 रुपये + 18 रुपये भरावे लागतील.
दरम्यान, बँकेच्या या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
