TRENDING:

पोरानं नाव काढलं! 24 व्या वर्षी पठ्याला मिळाली तब्बल 60 लाख पॅकेजची नोकरी!

Last Updated:

"मी नोकरीच्या शोधात असताना लीटकोड आणि लेव्हल्सच्या मदतीने मुलाखतीची तयारी करत होतो. मी सर्व डिस्कशन बोर्ड्समध्ये सहभाग घेतला होता'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आपल्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. बेंगळुरूमधील एका मुलाने आपल्या पालकांची ही इच्छा पूर्ण केली आहे. चित्रांश आनंद नावाच्या तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी तब्बल 60 लाख रुपये वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळवली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेला चित्रांश हा एमएनएनआयटी अलाहाबाद येथील माजी विद्यार्थी आहे. त्याने या पूर्वी दोन वर्षे ओरॅकल या प्रसिद्ध कंपनीत नोकरी केलेली आहे. आता उबरमध्ये वार्षिक 60 लाख रुपये पगाराची नोकरी मिळवून त्याने आपल्या पालकांना सुखद धक्का दिला आहे. तो पुढील महिन्याच्या शेवटी उबर कंपनीमध्ये रुजू होणार आहे. सर्वांत विशेष बाब म्हणजे त्याने नोकरीच्या मुलाखतीसाठी सात महिने तयारी केली होती.
News18
News18
advertisement

चित्रांश मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ असलेल्या मुघलसराय शहरातील आहे. 2022 मध्ये ओरॅकल कंपनीमध्ये त्याला 40 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाल्यानंतर तो बेंगळुरूमध्ये राहण्यासाठी आला होता. तेव्हापासून हे शहरच त्याचं घर बनलं आहे. उबरमध्ये आणखी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी असल्याचं समजताच त्याने मुलाखतीची तयारी सुरू केली होती. मुलाखतीची तयारी करण्यासाठी त्याने सात महिने रिसर्च केला आणि अनेकदा दिवसरात्र अभ्यास केला.

advertisement

मनीकंट्रोलशी बोलताना चित्रांश म्हणाला, "मी नोकरीच्या शोधात असताना लीटकोड आणि लेव्हल्सच्या मदतीने मुलाखतीची तयारी करत होतो. मी सर्व डिस्कशन बोर्ड्समध्ये सहभाग घेतला होता. तिथेच मला उबरमधील नोकरीबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. मुलाखतीच्या चार फेऱ्या होत्या. त्यापैकी दोन अवघड होत्या. विचारलेल्या प्रश्नांचा माझ्या शिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. पण, तरीही मी मुलाखत पास करू शकलो."

advertisement

कुटुंबाची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला की, त्याच्या पालकांना विशेषत: त्याच्या आईला त्याचा खूप अभिमान वाटतो. आई-वडील दोघेही खूप आनंदी आहेत. त्याची आई त्याच्यासोबत बेंगळुरूमध्ये राहते. त्याने रात्री उशिरापर्यंत जागून केलेल्या अभ्यासाची ती साक्षीदार आहे. पालकांनी त्याला आता नोकरीसोबत तब्येतीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे.

ओरॅकलमध्ये काम करत असताना चित्रांशने चांगल्या वर्क-लाइफ बॅलन्सचा अनुभव घेतला होता. त्याला पाचपैकी तीन दिवस ऑफिसमधून काम करावं लागत असे. आता उबरमध्ये त्याला आठवड्यातून फक्त दोन दिवस ऑफिसमध्ये जावं लागेल. नवीन ठिकाणी जास्त वेळ घालवावा लागणार नाही, असा त्याला विश्वास आहे.

advertisement

तो म्हणाला, "नवीन कंपनीतील माझ्या मॅनेजरशी मी याबाबत बोललो आहे. कंपनीचे डिस्कक्शन फोरमदेखील मी बघितले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, कामासाठी जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही. जास्त वेळ काम करण्याची गरज पडली तरी माझी काही हरकत नाही. करिअरच्या या टप्प्यावर मला वर्क-लाईफ बॅलन्सची काळजी वाटत नाही. उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर फायदा करून घेणं आणि कष्ट करणं गरजेचं आहे. नंतर मी आयुष्यात चांगलं संतुलन शोधू शकतो."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

आता पगार वाढला आहे. मिळणाऱ्या जास्त पैश्यांच्या खर्चाचं नियोजन केलं आहे का? असं विचारलं असता चित्रांश म्हणाला की, तो स्टॉक आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढवणार आहे. अमेरिकेतील मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचीही त्याची इच्छा आहे. सध्या तो कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत नाहीये.

मराठी बातम्या/करिअर/
पोरानं नाव काढलं! 24 व्या वर्षी पठ्याला मिळाली तब्बल 60 लाख पॅकेजची नोकरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल