टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी अँटीसॉक स्क्रीन प्रोटेक्टर फिल्म आणि एक ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीन खरेदी करावं लागतं. यात सॉफ्टवेअर असतं आणि ते अॅप्लिकेशनच्या माध्यमातून काम करतं. यातून तयार झालेली टेम्पर्ड ग्लास पॅक करून विकण्यासाठी पॅकिंग साहित्य खरेदी करावं लागेल.
घरी कशी तयार कराल टेम्पर्ड ग्लास?
अॅडव्हान्स टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीनच्या मदतीने टेम्पर्ड ग्लास तयार करणं सोपं आहे. यात सॉफ्टवेअर असतात. ते अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून कंट्रोल केले जातात. या मशीनच्या मदतीनं टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम टेम्पर्ड ग्लास शीट या मशीनमध्ये फीट करावं लागेल. मशीन सुरू करताना ते तुम्हाला मोबाइल किंवा लॅपटॉपला कनेक्ट करावं लागेल. या मशीनचं अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. या माध्यमातून तुम्ही हव्या तशा टेम्पर्ड ग्लासचं डिझाइन तयार करू शकता. यातून ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास तयार होते. तयार झालेली टेम्पर्ड ग्लास मशीनबाहेर काढून तुम्ही पॅकिंग करून ती विकू शकता.
advertisement
टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी किती खर्च येतो?
कोणताही व्यवसाय सुरू करताना त्यासाठीचा परवाना घेणं गरजेचं असतं. व्यवसाय सुरू केल्यावर कोणतीही कायदेशीर समस्या उद्भवू नये यासाठी परवाना गरजेचा असतो. टेम्पर्ड ग्लास निर्मितीची व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्यासाठी सुमारे एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत याची मशीन मिळेल. त्यात काही किरकोळ खर्च समाविष्ट केले तर दीड लाख रुपयांत तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता.
या व्यवसायात किती उत्पन्न मिळेल?
एक टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा रुपये खर्च येतो. बाजारात ही ग्लास 100 ते 200 रुपयांना, तर कधी चांगली क्वालिटी असल्याचं सांगून त्यापेक्षा महाग विकली जाते. एक टेम्पर्ड ग्लास एक कप चहाच्या किमतीत तयार होते. एकूणच एका टेम्पर्ड ग्लासमधून तुम्ही थेट 80 रुपयांपर्यंत सहज उत्पन्न मिळवू शकता. यावरून तुम्हाला या व्यवसायात किती कमाई होऊ शकते, याचा अंदाज येईल.
फोनला कोणती ग्लास लावावी?
सध्या बाजारात प्लास्टिक गार्ड, स्क्रीन गार्ड, 2D,3D,4D,5D,9D,11D अशा अनेक प्रकारच्या टेम्पर्ड ग्लास उपलब्ध आहेत. या प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. फोनला जास्त लेअर असलेली ग्लास लावावी. ज्या ग्लासचा थिकनेस चांगला आहे, ती फोनसाठी जास्त चांगली मानली जाते. जास्त लेअर असल्याने फोन हातातून खाली पडला तरी स्क्रीनचं नुकसान होत नाही. मोबाइलचा स्क्रीन चांगला राहतो. सामान्यतः 2.5D ग्लास स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठी चांगली असते. यामुळे फोन सुरक्षित राहतो.
