बारावी पास झाल्यावर सर्वच विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावू लागते. सायन्स व कॉमर्स शाखेतून बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात, तर ह्युमॅनिटिजच्या विद्यार्थ्यांकडे मर्यादित संधी असतात, असं अनेकांना वाटतं. पण हा समज चुकीचा आहे. सध्याच्या काळात नवीन कोर्सेसची मागणी वाढली आहे. यापैकी बरेच कोर्सेस कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट मानले जातात. कला शाखेतून बारावी पास झाल्यानंतर करिअरचे बेस्ट पर्याय कोणते, ते जाणून घ्या.
advertisement
लोको पायलटचा पगार किती असतो? आकडा वाचून व्हाल चकित!
कोणत्याही फील्डमध्ये बी.ए.
बीए म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स हा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत किंवा विषयात बीएचा अभ्यास करू शकता. भारतातील प्रत्येक विद्यापीठात आणि अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स शिकवले जाते. तीन वर्षांच्या बीए कोर्समध्ये इतिहास, भाषा, साहित्य, पत्रकारिता, भूगोल, सामाजिक विज्ञान आणि भाषाशास्त्र यासह अनेक विषयांमध्ये पदवी मिळवता येते. यानंतर तुम्ही एमए, एमबीए सारखे कोर्स करून तुमचे करिअर करू शकता किंवा थेट नोकरीसाठी अर्ज करू शकता.
लॉ कोर्सचा पर्याय
आजकाल एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर खूप क्षेत्रांमध्ये पाहायला मिळत आहे. पण लॉ हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये एआयचं वर्चस्व नाही. कला शाखेतून बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एलएलबी करू शकतात. तुम्ही या क्षेत्रात इंटिग्रेटेड कोर्सही करू शकता. यामध्ये तुम्हाला बीए+एलएलबी डिग्री मिळेल. यानंतर लाखो रुपये पगार असलेल्या नोकऱ्यांसाठी तुम्हाला अर्ज करता येईल.
upsc ची अवघड परिक्षा पास झाल्यानंतर एखाद्या IAS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार, काय मिळतात सुविधा?
क्रिएटिव्ह फील्डमधील ऑप्शन्स
जर तुम्हाला डिझायनिंग किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात इंटरेस्ट असेल तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या फील्ड्सचा अभ्यास करू शकता. पत्रकारितेचे क्षेत्र खूप विस्तृत आहे. यामध्ये तुम्हाला प्रिंट, डिजिटल, टीव्ही, आरजे, प्रॉडक्शन, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग अशा अनेक क्षेत्रांत विविध संधी सहज मिळतील. सोशल मीडिया हा एक चांगला करिअर ऑप्शन आहे. यामध्ये कमाईच्या अनेक संधी मिळू शकतात.