आजच्या काळात डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंगसारख्या क्षेत्रात करिअर करून दरमहा लाखो रुपये कमवू शकता. आता डिजिटल तंत्राला विशेष महत्त्व आलं आहे. जगातल्या प्रत्येक व्यवसायाला ऑनलाइन प्रेझेन्स वाढवायचा आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात लोकांना खूप मागणी आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये एसईओ, एसईएम, एसएमएम, पीपीसी, कंटेंट मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, गुगल अॅड्स, अॅनालिटिक्स आदी विषयांत प्रावीण्य मिळवून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता.
advertisement
फायनान्स क्षेत्रात भरपूर संधी आहेत. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आदी गोष्टींत करिअर करू शकता. डेटा सायन्स वेगानं विस्तारणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. डेटा सायंटिस्ट डेटाचं कार्यात्मक विश्लेषण करून व्यावसायिकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. यात तुम्ही मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय, पायथॉन, आर, एसक्यूएल, स्टॅटिस्टिक्स या विषयात प्रावीण्य मिळवून करिअर करू शकता.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे क्षेत्र वेगानं वाढतंय. यात वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केले जातात. या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत. त्यामुळे क्षेत्राची गरज लक्षात घेऊन शिक्षण घेतल्यास चांगली नोकरी मिळू शकते.
सध्या हेल्थकेअर अर्थात आरोग्य हे उदयोन्मुख क्षेत्र आहे. या क्षेत्रात डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, मेडिकल लॅब टेक्निशियन, डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आदी क्षेत्रात करिअरचे चांगले पर्याय आहेत. तुम्ही याबाबतचं शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.
