TRENDING:

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती! 85,000 हजार पगार, अर्जासाठी अवघे काही तास शिल्लक, कसा कराल अर्ज?

Last Updated:

Central Bank of India Recruitment Application Proccess : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने झोन बेस्ड ऑफिसर (ZBO) पदांसाठी भरती प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू केली आहे. पात्र उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने झोन बेस्ड ऑफिसर (ZBO) पदांसाठी भरती प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू केली आहे. पात्र उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 फेब्रुवारी 2025 आहे.
News18
News18
advertisement

रिक्त पदांची विभागवार माहिती:

अहमदाबाद: 123 पदे

चेन्नई: 56 पदे

गुवाहाटी: 43 पदे

हैदराबाद: 42 पदे

पात्रता निकष काय आहे?

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त समकक्ष पात्रता असावी. यामध्ये इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) समाविष्ट आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

advertisement

वयोमर्यादा काय?

उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे (जन्मतारीख 2 डिसेंबर 1992 ते 30 नोव्हेंबर 2003 दरम्यान).

अर्ज शुल्क किती?

अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), PwBD, महिला उमेदवार: 175 + GST

इतर सर्व उमेदवार: 850 + GST

शुल्क भरताना डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड किंवा मोबाइल वॉलेटचा वापर करता येईल.

advertisement

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या नंतर "Career with Us" टॅब अंतर्गत "Current Vacancies" या पर्यायावर क्लिक करा.

"Recruitment of Zone Based Officer in Junior Management Grade Scale I in Mainstream on Regular Basis" या लिंकवर क्लिक करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

"Click here for New Registration" या पर्यायावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. नंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती! 85,000 हजार पगार, अर्जासाठी अवघे काही तास शिल्लक, कसा कराल अर्ज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल