परीक्षा कधी होणार?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील त्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी केली पाहिजे. SBI ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेतली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इतर प्रक्रियांचा समावेश होतो. या भरतीद्वारे, उमेदवारांना देशातील सर्वात प्रतिष्ठित बँकेत काम करण्याची संधी मिळेल.
advertisement
अर्ज कसा कराल?
अर्ज प्रक्रिया सोपी असून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करू शकता. स्थानिक भाषा प्राविण्य आणि कार्यक्षम निवड प्रक्रियेवर भर देऊन, ही भरती मोहीम केवळ रोजगाराची हमी देत नाही तर प्रादेशिक प्रतिनिधित्वास प्रोत्साहन देते. उमेदवार एसबीआय लिपिक भरती 2024 शी संबंधित अधिक माहिती जसे की, परीक्षा नमुना, पात्रता आणि अभ्यासक्रम इत्यादी अधिकृत अधिसूचनेत वाचू शकतात, तसेच https://sbi.co.in/ या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता
अर्ज शुल्क किती आहे?
उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून फी ऑनलाइन भरू शकतात. अर्ज फी खालीलप्रमाणे आहे:-
सामान्य/OBC/EWS: ₹750/-
SC/ST/PwBD/ESM/DESM: सूट (शुल्क नाही)
दोन टप्प्यांत परीक्षा होणार?
प्रिलिम्स परीक्षा: ही इंग्रजी भाषेतील उमेदवारांची क्षमता, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यांचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेली स्क्रीनिंग चाचणी आहे.
मुख्य परीक्षा: सामान्य/आर्थिक जागरूकता, इंग्रजी, परिमाणात्मक योग्यता, तर्क क्षमता आणि संगणक योग्यता यांचा समावेश असलेल्या या टप्प्यासाठी प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार उपस्थित राहतील.
