बांका : बिहार सरकार शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी विविध योजनाही राबवल्या जात आहेत. या योजनांना स्थानिक स्तरावर राबवण्यासाठी शिक्षक काम करत आहेत. सरकारी शाळेत असे अनेक शिक्षक आहेत, जे नवनवीन पद्धतीने मुलांना फक्त शिकवतच नाही तर त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल, अशापद्धतीने त्यांच्यामधील कौशल्य विकसित करत आहेत.
advertisement
सोनी कुमारी असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या बिहारच्या बांका येथे कार्यरत आहेत. सोनी कुमारी या मुलांना विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे मुलांची शाळेतील उपस्थिती 98 टक्क्यांवर पोहोचली आहे. मुले लवकर शाळेत येतात आणि खेळातून शिकत आहेत.
बांका येथील अमरपूर गटातील विशंभरचक येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात सोनी कुमारी या कार्यरत आहेत. राजकीय माध्यमिक विद्यालय, विशंभरचक येथील मुख्याध्यापक जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, शिक्षिका सोनी कुमारी चहक कार्यक्रमातून प्रशिक्षण घेतले. यानंतर त्या मुलांना शारीरिक खेळ, कविता, इतर खेळ, अभिनय, नाटक या माध्यमातून शिकवत आहेत. उपक्रमावर आधारित शिक्षण या प्रकारामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
आता मुले त्यांच्या वर्गाची वाट पाहत असतात. शिकवण्याच्या या पद्धतीमुळे वर्गांमध्ये मुले उत्साहाने अभ्यास करतात. हा उपक्रम राबविल्याने मुलांची शाळेतील उपस्थिती 98 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शिक्षिका सोनी कुमारी ज्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे पालकही खूप खूश आहेत, असे ते म्हणाले.
तर याबाबत शिक्षिका सोनी कुमारी यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या अॅक्टिव्हिटीबाबत शाळेत शिकवताना मुलांची उपस्थिती इतकी वाढेल याबाबत विचार केला नव्हता. पण मुले शारीरिक क्रियाकलाप, कविता, खेळ आणि अभिनय याद्वारे शिकण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा आहे. मुलांमध्ये अभ्यासाचा वेगळाच उत्साह जागृत झाला आहे. मुले मोठ्या आनंदाने अभ्यास करत आहेत. यासोबतच खेळाच्या माध्यमातून अभ्यासाचा फायदा असा झाला आहे की, मुले बहुतांश वेळा शाळेतच राहणे पसंत करू लागली आहेत. विशेष म्हणजे ज्या मुलांना कविता आठवायला त्रास व्हायचा ते आता मोठ्याने कविता वाचून खेळत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
