अडीच फुटाच्या संध्याचा 5.5 फुटाच्या प्रभातवर आला जीव, 8 वर्षे चाललं अफेअर, पण आईने दिला नकार, शेवटी असं झालं लग्न
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जबलपूरमधील एक लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याठिकाणी अडीच फूट उंचीच्या वधूने साडेपाच फूट उंचीच्या मुलाशी लग्न केले. दोघेही आधी शेजारी होते. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शेवटी आठ वर्षांनी यांनी लग्न केले. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेयसीला मोठा संघर्ष करावा लागला. (भारत तिवारी, प्रतिनिधी, जबलपुर)
advertisement
advertisement
advertisement
प्रभात आणि संध्या शेजारी होते. 8 वर्षांपूर्वी दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नंतर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. संध्या आणि प्रभात यानंतर अनेकदा सोबतच फिरू लागले. काहीजण त्यांची खिल्लीही उडवायचे. मात्र, दोघांना काहीही फरक पडत नव्हता. त्यानंतर प्रभातला रीवा येथील एका कंपनीत नोकरी मिळाली. तसेच संध्या एक नृत्यांगना आहे. ती विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करते.
advertisement
संध्या ने जव्हा प्रभात सोबत लग्न करण्याबाबत आपल्या आईला सांगितले तेव्हा आधी तिच्या आईने होकार दिला. मात्र, नंतर नकार दिला. तेव्हा संध्याने लग्नासाठी हट्ट केला असता आईने घरातून तिला बाहेर काढून टाकले. शेवटी तिने जबलपूर येथील बीएचसीएचआय संस्थेकडे धाव घेतली. या संस्थेने तिला फक्त राहायला जागाच दिली नाही प्रभातसोबत लग्नाचे आश्वसनही दिले. प्रभातच्या घरची लोकं या लग्नाला तयार होती. त्यामुळे संस्था ही संध्याचे कुटुंब बनली आणि धुमधडाक्यात हे लग्न पार पडले.


