TRENDING:

शेतकऱ्याचा पोरगा झाला सरकारी अधिकारी, तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश, कसा होता हा प्रवास?

Last Updated:

यशपालची आई कृष्णा सोनी या गृहिणी आहेत. यशपाल हा दोन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. 2021 मध्ये त्याने एमपीपीएससी परिक्षेची तयारी केली होती. 2019-20 या परिक्षेत त्याला यश मिळाले नाही. मात्र, 2021 मध्ये त्याला यश मिळाले. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनुज गौतम, प्रतिनिधी
यशपाल स्वर्णकार
यशपाल स्वर्णकार
advertisement

सागर : अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही यश मिळवता येते, हे एका शेतकऱ्याचे मुलाने सिद्ध करुन दाखवले आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आता सरकारी अधिकारी झाला आहे. यशपाल स्वर्णकार असे या तरुणाचे नाव आहे. सब ऑर्डिनर अकाउंट सर्विस या पदावर त्याची निवड झाली आहे.

मध्यप्रदेश राज्य लोकसेवा आयोगाने 2021 मधील परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये लहान गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने यश मिळवले आहे. तिसऱ्या प्रयत्नात यशपाल स्वर्णकार या तरुणाने हे यश मिळवले. तो मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचा खमकुआ गावातील रहिवासी आहे. यशपालची आई कृष्णा सोनी या गृहिणी आहेत. यशपाल हा दोन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. 2021 मध्ये त्याने एमपीपीएससी परिक्षेची तयारी केली होती. 2019-20 या परिक्षेत त्याला यश मिळाले नाही. मात्र, 2021 मध्ये त्याला यश मिळाले.

advertisement

दोन वेळा अपयश, पण ती हरली नाही, कनिष्ठ लिपिकाची मुलगी झाली नायब तहसिलदार, आस्थाची प्रेरणादायी गोष्ट!

त्याचे वडील राम नरेश सोनी हे शेती करतात. त्याच्या जवळ 10 एकर शेती आहे. मध्यमवर्गीय परिवारातून येणाऱ्या यशपालने पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेतून घेतले. यानंतर बीएससीचे शिक्षण हे बीटीआयई कॉलेज मकरोनिया मधून केले. आधी तो आपल्या शेतातही काम करायचा. मात्र, कुटुबीयांची इच्छा होती की, त्याने चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करावी, त्यामुळे त्याला इंदूर येथे पाठवण्यात आले.

advertisement

इंदूरला गेल्यावर त्याने एका कोचिंगला ज्वाईन केले आणि तिथे तयारी सुरू केली. याठिकाणी त्याला एमपीपीएससीच्या तयारीबाबत मार्गदर्शन मिळाले. कोचिंगच्या शिक्षणानंतर त्याने सेल्फ नोट्स तयार करायला सुरुवात केल्या. जुन्या प्रश्नपत्रिका तपासल्या आणि अशाप्रकारे तयारी केली. आता त्याच्या यशानंतर सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जर कोणी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असेल तर तुमचे मन फक्त अभ्यासावर केंद्रित करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल, अशी सल्ला दिला.

advertisement

दोन वेळा अपयश, पण ती हरली नाही, कनिष्ठ लिपिकाची मुलगी झाली नायब तहसिलदार, आस्थाची प्रेरणादायी गोष्ट!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

वहीं यशपाल अभी इंदौर में हैं. वह जल्द ही अपने गांव वापस लौटेंगे. यशपाल ने बताया कि अगर कोई कंपटीशन की तैयारी कर रहा है तो मन को एकाग्र होकर केवल पढ़ाई में लगाएं तो आपको सफलता जरूर मिलेगी. यशपाल की मां कृष्णा सोनी गृहणी हैं. यशपाल दो भाई और दो बहनों में सबसे छोटे हैं.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
शेतकऱ्याचा पोरगा झाला सरकारी अधिकारी, तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश, कसा होता हा प्रवास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल