दोन वेळा अपयश, पण ती हरली नाही, कनिष्ठ लिपिकाची मुलगी झाली नायब तहसिलदार, आस्थाची प्रेरणादायी गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
एमपीपीएससी 2021 निकाल आल्यानंतर तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सेल्फ स्टडी आणि स्वत: नोट्स तयार करुन तिने अभ्यास केला, जुन्या प्रश्नपत्रिकांची उजळणी केली.
अनुज गौतम, प्रतिनिधी
सागर : समाजात असे अनेक तरुण-तरुणी आहेत, ज्यांच्या यशामुळे फक्त आई वडिलांचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे, जिल्ह्याचे नाव मोठे होते. त्यांच्यामुळे तरुणाईला प्रेरणा मिळते. आज अशाच एका तरुणीची यशस्वी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आस्था चौबे असे या तरुणीचे नाव आहे. कनिष्ट लिपिकाची मुलगी असलेल्या आस्था चौबे हिची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.
advertisement
एमपीपीएससी 2021 निकाल आल्यानंतर तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सेल्फ स्टडी आणि स्वत: नोट्स तयार करुन तिने अभ्यास केला, जुन्या प्रश्नपत्रिकांची उजळणी केली. यासाठी त्यांनी तीन वेळा सतत प्रयत्न केले. यानंतर आता मध्यप्रदेश राज्य लोकसेवा आयोगाची कठीण परिक्षेत तिने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. आस्था चौबे तिच्या भावासोबत इंदूरमध्ये अभ्यास आहे. तिचा भाऊ एमपीपीएससीची तयारी करत आहे. आस्थाला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत.
advertisement
तिचे वडील रामनरेश चौबे हे सागरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिलगन गावचे रहिवासी आहेत. ते विद्यापीठात एलडीसी पदावर होते. मागच्या वर्षी ते निवृत्त झाले. आस्था हिने केंद्रीय विद्यालय ढाना येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर बीएस्सीचे शिक्षण घेतले. पदवीच्या शिक्षणानंतर तिने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली.
NEET चा दबाव, आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षित यश न मिळाल्याने उचललं टोकाचं पाऊल
लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, सुरुवातीला तिने क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतले. मात्र, नंतर सेल्फ स्टडी आणि स्वत: नोट्स तयार करुन तिने अभ्यास केला, जुन्या प्रश्नपत्रिकांची उजळणी केली. स्वत:वर विश्वास ठेवा आणि जास्त मेहनत करा. त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल, असे तिने सांगितले.
advertisement
success story : एकेकाळी 20 रुपये मिळवायलाही अडचण होती, आता आठवड्याला 2 हजार रुपये कमावतायेत या महिला
न्यायालयातही सामना करावा लागला -
view commentsती पुढे म्हणाली की, 2019 च्या परीक्षेत तिचे पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा पास झाली होती. मात्र, नंतर पूर्व परिक्षेच्या पडताळणीमुळे तिला यादीतून बाहेर केले गेले. यामुळे त्यांना न्यायालयाच्याही फेऱ्या माराव्या लागल्या. अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, तसेच एकत्र कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की अभ्यास आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पैसेही नव्हते. पण अशा सर्व परिस्थितीत तिने मात केली आणि आता तिची नायब तहसिलदारपदी निवड करण्यात आली आहे.
Location :
Sagar,Madhya Pradesh
First Published :
June 08, 2024 9:53 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
दोन वेळा अपयश, पण ती हरली नाही, कनिष्ठ लिपिकाची मुलगी झाली नायब तहसिलदार, आस्थाची प्रेरणादायी गोष्ट!


