NEET चा दबाव, आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षित यश न मिळाल्याने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
नुकताच नीट परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.
शक्ती सिंग, प्रतिनिधी
कोटा : कोचिंग नगरी म्हणून देशात कोटा शहर प्रसिद्ध आहे. मात्र, याठिकाणी आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकताच नीट परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ही विद्यार्थिनी मध्यप्रदेशातील रहिवासी होती. नीटचा निकाल आल्यानंतर ती तणावात होती. अखेर तिने मोठ्या उंच इमावरतीवरुन उडी घेत आत्महत्या केली.
advertisement
बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास तिने आत्महत्या केली. मल्टीस्टोरी बिल्डिंगवरुन उडी घेत तिने आपले जीवन संपवले. अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, 18 वर्षांची विद्यार्थिनी हिचे नाव बागिशा तिवारी असे आहे. ती मध्यप्रदेशातील रीवा येथील रहिवासी होती. कोटामध्ये ही मुलगी आपली आई आणि भावासोबत कोटा येथील जवाहर नगरमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती आणि नीटची तयारी करत होती.
advertisement
success story : एकेकाळी 20 रुपये मिळवायलाही अडचण होती, आता आठवड्याला 2 हजार रुपये कमावतायेत या महिला
या विद्यार्थिनीने 5 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली की 9 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिच्या आईची मानसिक स्थिती सध्या ठिक नाही. त्यांना खूप मोठा धक्का बसल्याने त्या योग्य ती माहिती देऊ शकत नाहीयेत. तिला कुणीतरी पाहिले होते आणि वाचवण्याचा प्रयत्नही केला होता, अशी माहितीही समोर आली आहे.
advertisement
Fruits For Skin : चेहऱ्यावरचा ग्लो वाढेल, फक्त दररोज खा ही 3 फळे, उन्हाळ्यातही चमकेल त्वचा
बिल्डींगवरुन उडी घेत आत्महत्या केल्याने तिला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या एक दिवस आधीच तिचा निकाल आला होता. त्यानंतर ती तणावात होती, त्या मुलीला समुपदेशनाची गरज होती, असे शेजारी राहणाऱ्या सुजाता यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, कोचिंग नगरी कोटा येथे आत्महत्येची 11 वी घटना आहे. मागील 6 महिन्यात कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मागच्या वर्षी 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
view commentsLocation :
Kota,Rajasthan
First Published :
June 08, 2024 9:27 AM IST
मराठी बातम्या/देश/
NEET चा दबाव, आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षित यश न मिळाल्याने उचललं टोकाचं पाऊल


