Fruits For Skin : चेहऱ्यावरचा ग्लो वाढेल, फक्त दररोज खा ही 3 फळे, उन्हाळ्यातही चमकेल त्वचा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ज्या फळांमध्ये व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडेंट असेल अशी फळे दररोज खायला हवीत. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहील. या फळांमध्ये पुढील फळांचा समावेश आहे.
आकांक्षा दिक्षीत, प्रतिनिधी
दिल्ली : आजच्या काळात लोक सुंदर दिसण्यासाठी अनेक मोठ्या महागड्या ब्यूटी प्रॉडक्टचा वापर करतात. तसेच विविध प्रकारच्या ब्यूटी ट्रीटमेंटही करतात. मात्र, यापेक्षा जास्त शरीराला एक चांगल्या आहाराची आवश्यकता असते. कारण, जर तुम्ही चांगला आहार घ्याल तर तुमच्या त्वचेवर चमक येईल. त्यामुळे काही फळांबाबत जाणून घेऊयात.
डाइट टू नरिशच्या प्रियंका जैसवाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मानव रचना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, फरीदाबाद येथून त्यांनी अन्न आणि पोषण विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्येही काम केले आहे. जसे की, मॅक्स हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल आणि एम्स सारख्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 10 वर्षांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात लोकांना निरोगी आहार घेण्याच्या टिप्स देत आहेत.
advertisement
तुम्ही कितीही महागडे उपचार केलेत किंवा सौंदर्य उत्पादने वापरतील तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. तसेच तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या कायम राहतील, असे त्या म्हणाल्या.
success story : एकेकाळी 20 रुपये मिळवायलाही अडचण होती, आता आठवड्याला 2 हजार रुपये कमावतायेत या महिला
या फळांचा होणार फायदा -
ज्या फळांमध्ये व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडेंट असेल अशी फळे दररोज खायला हवीत. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहील. या फळांमध्ये पुढील फळांचा समावेश आहे.
advertisement
संत्री – संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिटामिन आहे. हे विटामिन त्वचेला घट्ट ठेवते. चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखते आणि त्वचा लवचिक आणि तरुण ठेवते. याशिवाय संत्र्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मही असतात. हे गुणधर्म त्वचेची सूज, जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.
टरबूज - डिहायड्रेशनमुळे तुमची स्कीन ही डल आणि वाळते. त्यामुळे तुम्ही टरबूज खायला हवे. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि मॉइस्चराइज ठेवण्यासाठी मदत करते. टरबूज बियाणेही फायदेशीर आहे. त्यात लिनोलिक अॅसिडसारखे असंतृप्त फॅटी ऍसिड असते. यामुळे त्वचेला लवचिक आणि तरुण ठेवता येते.
advertisement
बेरी - ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीसारख्या बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेचे हानी आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा अधिक काळ चमकदार आणि तरुण राहण्यास मदत होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Delhi
First Published :
June 07, 2024 3:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fruits For Skin : चेहऱ्यावरचा ग्लो वाढेल, फक्त दररोज खा ही 3 फळे, उन्हाळ्यातही चमकेल त्वचा