मुजफ्फरपुर : शेतकरी कुटुंबातील मुलेही आज चांगल्या मोठ्या पदांवर जात आहेत. मेहनतीने आणि जिद्धीने कठोर परिश्रमाच्या बळावर सर्वांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याचा मुलगा हा सरकारी अधिकारी झाला आहे. जाणून घेऊयात त्याचा प्रेरणादायी प्रवास.
मयंक असे या तरुणाचे नाव आहे. बिहार लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी यश मिळवले. मध्यम वर्गीय कुटुंबातून येणारे मयंक आता गटविकास अधिकारी झाले आहेत. मयंक यांचे वडील शेतकरी आहेत. तर मयंकने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, त्यांनी सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती.
advertisement
मयंकचे आजोबांची इच्छा होती की, मयंकने सरकारी अधिकारी व्हावे. यानंतर मयंकने बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. मात्र, तरीही त्यांनी तयारी सुरू ठेवली. तसेच आणखी जास्त मेहनत करत यावेळी त्यांना 457 वी रँक मिळाली आणि गटविकास अधिकारी पद मिळाले आहे.
मयंकने सांगितले की, त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे स्वप्न होते की, त्यांनी सरकारी नोकरी करावी. आजोबांचे स्वप्न करण्यासाठी मोठ्या वडिलांनीही खूप मेहनत केली होती. मात्र, ते अगदी कमी गुणांनी मागे राहिले. तर मयंकच्या मम्मीचीही इच्छा होती की, मयंकने सरकारी नोकरी करावी. यादरम्यान, त्यांचे निधन झाले. आज आजोबा आणि मोठ्या आई असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मयंकने आपल्या या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय आणि मित्रांना दिले. आपल्या मित्रांसोबत ते अभ्यास करायचे. आजपर्यंत मयंकने कोणतीही ट्युशन घेतली नाही. स्वयंअध्ययनाने आज या पदापर्यंत ते पोहोचले.
10 लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली -
मयंकने सांगितले की, इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना 10 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली होती. बायजूमध्ये त्यांना ही नोकरी मिळाली होती. तसेच काही काळ त्यांनी याठिकाणी नोकरीही केली. मात्र, सरकारी अधिकारी बनायचं स्वप्न पाहत त्यांनी ही नोकरी सोडली. आता ते गटविकास अधिकारी झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे लग्न हुंडा न घेता करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.