TRENDING:

बालपणी उडवलं कागदाचं विमान, आता बनणार पायलट, शेतकऱ्याच्या पोरासाठी गावकऱ्यांनी बजावली मोलाची भूमिका

Last Updated:

प्रोबिन याचे वडील मानसिंह मुर्मू हे शेतकरी आहेत. तर आई मानको मुर्मू गृहिणी आहेत. आज आपण या ध्येयवेड्या तरुणाची कहाणी जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी
प्रोबिन मुर्मू असे या तरुणाचे नाव आहे.
प्रोबिन मुर्मू असे या तरुणाचे नाव आहे.
advertisement

जमशेदपुर : लहानपणी मुले विविध खेळ खेळतात. मात्र, काही वेळा काही खेळ मुलांना इतके प्रभावित करतात की बालपणापासून आपण मोठे झाल्यावर काय व्हायचं आहे, हे मनात ठरवतात आणि त्यादिशेने तयारी करतात. आज अशाच एका ध्येयवेड्या तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

प्रोबिन मुर्मू असे या तरुणाचे नाव आहे. बालपणी कागदाचे विमान उडवणारा हा तरुणाने उराशी प्रत्यक्षात विमान उडवण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यामुळे प्रोबिन आता त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेईई मेन्सची तयारी करण्यासाठी कोटा येथे जाणार आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. तसेच त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण असल्याने गावकऱ्यांनी त्याच्यासाठी पैसे जमा केले.

advertisement

IIT Bombay मधून शिक्षण, आता United Nations कडून सर्वात मोठा लष्करी सन्मान, कोण आहेत मेजर राधिका सेन?

पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगत त्याने प्रचंड मेहनत घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. 9 वीत असताना पासून त्याने एक रुटीन बनवले आणि प्रमुख विषयांचा तीन ते चार तास अभ्यास केला. तसेच अत्यंत कठोर मेहनतीनंतर त्याने दहावीच्या परीक्षेत 484 गुण मिळवत जिल्ह्यात टॉप केले. त्याच्या या यशानंतर गावाचाही परिसरात मोठा सन्मान झाला.

advertisement

दहावीचा टॉपर असताना त्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यात त्याला पायलट बनायचे असल्याने त्याच्या अॅरॉनॉटिकल इंजीनिअरींगच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. याबाबतची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी वर्गणी जमा करायला सुरुवात केली. यासाठी प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार, मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला. यामुळे याचा परिणाम असा झाला की, आता प्रोबिन याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेईई मेन्सची तयारी करण्यासाठी कोटा येथे जाता येणार आहे. तेथील एका शिक्षणसंस्थेत त्याला प्रवेश मिळाला आहे.

advertisement

inspiring story : किराणा दुकानदाराच्या मुलाची कमाल, जर्मनीच्या कंपनीकडून मिळालं तब्बल 26 लाख रुपयांचं पॅकेज

सरपंचाने दिले 10 हजार -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

प्रोबिन याचे वडील मानसिंह मुर्मू हे शेतकरी आहेत. तर आई मानको मुर्मू गृहिणी आहेत. प्रोबिन याने लोकल18 शी बोलताना सांगितले की, जेईई मेन्स परिक्षेच्या तयारीसाठी आर्थिक समस्येची माहिती गावाच्या संरपंचाना मिळाल्यावर गावातील सर्व लोकांनी आर्थिक मदत केली. यामध्ये गावाचे सरपंच राकेश चंद्र मुर्मू यांनी 10 हजार रुपयांची मदत केली. तसेच घाटशिला येथील डॉ. देवेन टुडू यांनीही 10 हजार रुपयांची मदत केली. लोकांनी मदत केल्याने त्याचे पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. जेईई मेन्स उत्तीर्ण झाल्यानंतर मी वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पायलट होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
बालपणी उडवलं कागदाचं विमान, आता बनणार पायलट, शेतकऱ्याच्या पोरासाठी गावकऱ्यांनी बजावली मोलाची भूमिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल