लखनऊ : जेव्हा कठीण परिश्रम केले जातात, दृढ संकल्प घेऊन त्यावर मार्गक्रमण केले जाते, तेव्हा यश नक्कीच मिळते, असे म्हणतात. अशीच एक कहाणी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने मित्रांच्या मदतीने नैराश्यावर मात करत कठीण परिक्षेत तब्बल 97.7 टक्के गुण मिळवले आहेत.
गौरव यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उत्तरप्रदेशातील कतरारी, महाराजगंज येथील रहिवासी आहे. जानेवारी महिन्यात जेईई मेन्स परीक्षेत गौरवने चांगले गुण मिळवले होते. मात्र, तो आपल्या गुणांवर समाधानी नव्हता. यामुळे त्याने पुन्हा एप्रिल महिन्यात जेईई मेन्स ही परीक्षा दिली आणि यामध्ये आधीच्या तुलनेत आणखी चांगले गुण मिळवले. तसेच आपल्या कुटुंबाचे आणि जिल्ह्याचेही नाव मोठे केले.
advertisement
गौरवने सांगितले की, तो अत्यंत दुर्गम भागातून येतो. याठिकाणी साधने खूप कमी आहेत. मात्र, त्याची स्वप्ने मोठी होती. त्याने अकरावी आणि बारावीचे शिक्षण गोरखपूर येथील पादरी बाजारात आपल्या मामाच्या घरी राहून घेतले. या दरम्यान त्याने ABC Classes मध्ये प्रवेश घेतला. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. पहिल्यांदा स्कोअर अपेक्षेनुसार न आल्याने गौरव खूप निराश होता. मित्रांनी त्याला मदत केली आणि मग त्याने हार न मानता पुन्हा प्रयत्न केले.
PHOTOS : नवव्या पिढीतील या कलाकाराचा बॉलिवूडमध्ये डंका, संजय लीला भन्साळी, प्रितम दासोबतही केलं काम
त्याने आपले मित्र सूर्याशू आणि सिद्धांत यांच्या मदतीने एक टेलिग्राम ग्रुप बनवला आणि जानेवारी महिन्यातील चूका शोधून काढल्या. त्या सुधारण्यासाठी 18 दिवसात 45 पेक्षा जास्त मॉक टेस्ट दिल्या. तसेच बोर्डाच्या परीक्षेनंतर तो दररोज 15 ते 16 तास अभ्यास करत होता. याचा परिणाम चांगला आणि यामध्ये सूर्यांशूला 96 टक्क्यांवरुन 98.2 टक्के, सिद्धांतला 97.3 टक्क्यांवरुन 97.8 टक्के तर गौरवला 87 टक्क्यांवरुन 97.7 टक्के मिळाले.
उन्हामुळे चेहरा पडला काळा, फक्त एक काम करा, अभिनेत्रीसारखा चेहऱ्यावर येईल ग्लो
भाऊ आणि आई-वडिलांचा पाठिंबा -
गौरवने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ आयआयटी भोपाळ याठिकाणी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहेत. त्याने परीक्षेची तयारीदरम्यान, मार्गदर्शन आणि सहकार्य केले. तसेच आई-वडिलांनीही पाठिंबा दिला. गौरवलाही कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेऊन एक प्रतिष्ठित सॉफ्टवेअर इंजीनिअर बनायचे आहे. या यशाच्या माध्यमातून समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढावे. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळून त्यांनी उच्चशिक्षणाकडे वळावे, अशी त्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला.