TRENDING:

MBA इथून पूर्ण केलं की, मिळतं 54 लाखांपर्यंतचं पॅकेज, Microsoft, Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये मिळते संधी

Last Updated:

IIM मुंबईने 2025 बॅचसाठी आपल्या प्लेसमेंट सिझनचा समारोप 54 लाख रुपये वार्षिक पॅकेजासह केला. 78 कंपन्यांनी सहभाग घेतला आणि 373 नोकरी ऑफर्स दिल्या. यामध्ये Microsoft, Amazon, आणि Accenture सारख्या कंपन्यांचा समावेश होता. इंटर्नशिप स्टायपेंड 5 लाख रुपये होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही वर्षांपासून, पदवी पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी MBA करण्यासाठी धाव घेताहेत. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळवणे. मात्र, ज्यांना MBA करायचं असतं, त्यांची इच्छा असते ती IIM मधून शिक्षण पूर्ण करण्याची. IIM मध्ये शिक्षण घेण्यासाठी CAT परीक्षेला पास होणं अत्यंत आवश्यक आहे. CAT मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एकच चिंता असते, ती म्हणजे चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी कुठून प्रवेश घ्यावा. चला, आज आपण IIM मुंबईबद्दल जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

हे ही वाचा : व्यवसाय सुरु करण्यासाठी नव्हते पैसे, 5 हजार रुपये घेतलं कर्ज, वर्षांकाठी कोटींची उलाढाल करण्याऱ्या सुरेश यांची कहाणी

IIM मुंबईने 2025 च्या बॅचसाठी आपला प्लेसमेंट सिझन मोठ्या आनंदाने पूर्ण केला आहे. या वर्षीचा सर्वात उच्च पॅकेज 54 लाख रुपये वार्षिक होता, जो संस्थेचा आतापर्यंतचा सर्वात उच्च पॅकेज आहे. या सिझनमध्ये 78 कंपन्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतला आणि एकूण 373 नोकरी ऑफर दिल्या. यावर्षी कोका-कोलाने 5 लाख रुपयांचा इंटर्नशिप स्टायपेंड दिला, जो व्यावसायिक इंटर्नशिपसाठी एक नवा विक्रम ठरला.

advertisement

Microsoft, Amazon, Accenture आणि अनेक FMCG कंपन्यांनी या सिझनमध्ये आपला ठसा सोडला. Microsoft ने सर्वाधिक वार्षिक पॅकेज दिलं. प्लेसमेंट सिझन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाला आणि यामध्ये सरासरी स्टायपेंडमध्ये 15% वाढ झाली. हे फक्त संस्थेच्या गुणवत्ता दर्शवत नाही, तर उद्योगाच्या गरजांशी संबंधित अभ्यासक्रमाच्या सामंजस्याचं प्रतीक आहे.

IIM मुंबईचे संचालक प्रोफ. मनोज कुमार तिवारी यांनी याबद्दल सांगितलं की, “प्लेसमेंटचा निकाल हा आमच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं आणि संस्थेच्या उच्च शैक्षणिक मानकांचं प्रमाण आहे. आमचा उद्योग-केन्द्रित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात उत्तम प्रदर्शन करण्यास तयार करतो.” यामध्ये कन्सल्टिंग, IT, FMCG आणि BFSI क्षेत्रांचं महत्त्व वाढलं आहे. तसेच, तंत्रज्ञान आणि टिकावावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भूमिकांमध्येही महत्त्वपूर्ण वाढ दिसून आली.

advertisement

हे ही वाचा : बँकेचा चेक भरताना या चुका करू नका, या टिप्स फाॅलो करा, अन्यथा लाखाचे बारा हजार होतील…

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

IIM मुंबईने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “आकर्षक पॅकेजेस, प्रमुख कंपन्यांकडून सहभाग आणि विक्रमी ऑफर्स हे आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्याचं प्रतीक आहेत. हे संस्थेच्या यशाचं आणि उद्योगात आमच्या वाढत्या महत्त्वाचं दर्शक आहे. IIM मुंबईने एकदाच सिद्ध केलं आहे की, ते भविष्याच्या व्यवसाय नेत्यांची तयारी करण्याच्या आपल्या उद्दिष्टात यशस्वी आहे.”

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
MBA इथून पूर्ण केलं की, मिळतं 54 लाखांपर्यंतचं पॅकेज, Microsoft, Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये मिळते संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल