TRENDING:

Railway Gateman Salary: रेल्वेत गेटमनला किती पगार मिळतो?

Last Updated:

दैनंदिन आयुष्यात रेल्वेनं हजारो लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेवर एक गेटमन असतो. तुम्ही कधी विचार केलाय का की या गेटमनला किती पगार असेल किंवा गेटमन बनवण्यासाठी काय करावं लागतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 10 डिसेंबर : दैनंदिन आयुष्यात रेल्वेनं हजारो लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेवर एक गेटमन असतो. तुम्ही कधी विचार केलाय का की या गेटमनला किती पगार असेल किंवा गेटमन बनवण्यासाठी काय करावं लागतं. चला तर मग जाणून घेऊया.
रेल्वेत गेटमनला किती पगार मिळतो?
रेल्वेत गेटमनला किती पगार मिळतो?
advertisement

भारतीय रेल्वेची नोकरी ही प्रत्येक तरुणाची पहिली आवडती नोकरी आहे. दरवर्षी रेल्वे वेगवेगळ्या पदांवर रिक्त जागा सोडते. याद्वारे दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती केली जाते. यामध्ये गट ड ते स्टेशन मास्तर या पदांवर जागा भरली जाते. रेल्वेतील यापैकी एक पद हे गेटमनचे आहे. त्याची रेल्वे ग्रुप डी अंतर्गत रिक्त जागा भरली जाते. या पदावर जे उमेदवार निवडले जातात, त्यांना पगारासह अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तुम्हीही या पदांवर नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल तर सर्वप्रथम हे दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचा.

advertisement

Government Jobs : 10 वी नंतर सरकारी नोकरीची संधी, 31 डिसेंबरआधीच करा अर्ज!

जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या रेल्वे गेटमन पदासाठी पात्र आहात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन दिले जाते. भारतीय रेल्वेच्या गेटमन पदासाठी ज्यांची निवड केली जाते. त्यांना 18000 ते 32859 पर्यंत पगार असतो. त्यांना पगारासह पुढील भत्ते आणि फायदे दिले जातात.

advertisement

गृहनिर्माण भत्ता

महागाई भत्ता

नाईट ड्युटी भत्ता

राष्ट्रीय सुट्टी भत्ता

प्रवास भत्ता

ड्रेस भत्ता

रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंगची जबाबदारी गेटमनकडे असते. या कामात गाड्या, रस्त्यावरील वाहने आणि पादचाऱ्यांना जाण्यासाठी हाताने किंवा मशीनने फाटक उघडणे किंवा बंद करणे समाविष्ट आहे. रेल्वे फाटकाच्या शेजारी गेटमनची केबिन आहे. रेल्वे पासिंगसाठी L/Axing बंद करण्याबाबत केबिन मॅनसोबत खाजगी क्रमांकांची देवाणघेवाण करताना लॉगबुक ठेवावे लागते. ड्युटीवर असलेल्या स्टेशन मास्टरने दिलेल्या सर्व आदेशांचं त्यानं पालन करणं अपेक्षित आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी सार्वजनिक तक्रार पुस्तिका तयार करावी लागते, त्याची रेल्वे अधिकाऱ्यांकडून तपासणीही केली जाते.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Railway Gateman Salary: रेल्वेत गेटमनला किती पगार मिळतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल