झाशी : सध्या मागच्या महिन्यात नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. दहावी, बाराचीचे वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष असते. त्यामुळे प्रत्येक जण या परीक्षांच्या निकालाची वाट पाहत आहेत. एकीकडे विद्यार्थी आणि त्यांचे पालक उत्साहित आहेत. तर दुसरीकडे काही विद्यार्थी हे निकालाच्या भीतीने चिंतेत असतात.
यासोबतच आता काही विद्यार्थी पुन्हा पुन्हा आपल्या गुणांचा अंदाज लावतात आणि तणावात असतात. या तणावामुळे त्यांना नीट झोपसुद्धा लागत नाही. त्यामुळे या सर्व परिस्थितीतमध्ये बोर्डाच्या परीक्षेला कसे हँडल करावे आणि स्वत:ला कसे प्रेरित करावे, यासाठी लोकल18 च्या टीमने हेल्थ एक्सपर्ट डॉ. सिकाफा जाफरीन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
कॅन्सरमुळे आईचे निधन, बहिणीनेही सोडली साथ, पण तरी प्राचीनं करुन दाखवलं, Paralympic साठी निवड...
लोकल18 शी बोलताना डॉ. सिकाफा जाफरीन यांनी सांगितले की, फक्त परीक्षा आणि निकालाचा विचार करू नका. कोणतीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यातील ही फक्त एक वेळ आहे, जी निघून जाईल. पेपरमध्ये जे काही व्हायचे ते झाले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा गुण तपासू नका, हे लक्षात ठेवा, असे त्या म्हणाल्या.
पालकांची भूमिका महत्त्वाची -
डॉ. सिकाफा यांनी पुढे सांगितले की, जे झाले त्याबाबत विचार करण्यापेक्षा तुम्ही आता भविष्याचा विचार करा. निकालाला स्पर्धेच्या दृष्टीने पाहू नका. बोर्डाच्या निकालाच्या काळात पालकांनीही लक्षात ठेवावे की त्यांनी आपल्या मुलांवर जास्त ताण आणू नये. जर मुले अस्वस्थ दिसत असतील तर त्यांना प्रोत्साहन देत रहा. पालकांची भूमिका यात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी मुलांचा आधार बनला पाहिजे. आपल्या मुलांना सामना करण्यास शिकवायला हवे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
