TRENDING:

UPSC : यूपीएससीच्या CSAT पेपरची तयारी कशी करावी? एका चुकीमुळे भंगू शकतं आयएएस होण्याचे स्वप्न

Last Updated:

आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा यांनी यूपीएससीच्या सीसॅट परीक्षेची तयारी कशी करता येईल, याबाबत टिप्स दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षेसाठी उमेदवार खूप तयारी करतात. या परीक्षेतील सीसॅट हा क्वालिफाईंग पेपर असतो. त्याचा अभ्यासक्रम खूप जास्त असतो. यात उत्तीर्ण झाल्याशिवाय मुख्य परीक्षेला बसता येत नाही. आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा यांनी यूपीएससीच्या सीसॅट परीक्षेची तयारी कशी करता येईल, याबाबत टिप्स दिल्या आहेत.
यूपीएससीच्या CSAT पेपरची तयारी कशी करावी? एका चुकीमुळे भंगू शकतं आयएएस होण्याचे स्वप्न
यूपीएससीच्या CSAT पेपरची तयारी कशी करावी? एका चुकीमुळे भंगू शकतं आयएएस होण्याचे स्वप्न
advertisement

यंदाच्या वर्षी यूपीएससीच्या प्रीलिम्स परीक्षा मे महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी लाखो उमेदवार तयारी करत असतात. प्रीलिम्समधला सीसॅट हा क्वालिफाइंग पेपर असतो. सीसॅट म्हणजेच ‘सिव्हिल सर्व्हिसेस अप्टिट्युड टेस्ट’. गेल्या काही वर्षांत या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कठीण झाला आहे. या परीक्षेत किमान गुण प्राप्त केल्याशिवाय मुख्य परीक्षेला बसता येत नाही. सोशल मीडियावर यूपीएससीच्या परीक्षेबाबत अनेक आयएएस अधिकारी मार्गदर्शन करतात. त्यापैकी एक आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा यांनीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना परीक्षेबाबत काही टिप्स दिल्या आहेत. सीसॅट परीक्षेबाबत त्यांनी दिलेल्या टिप्स उमेदवारांना उपयोगी पडू शकतात.

advertisement

सीसॅट परीक्षा काय असते?

यूपीएससी परीक्षा विविध टप्प्यात पार पडते. त्यात क्वालिफाईंग पेपरही असतो, तो म्हणजे सीसॅट. ही परीक्षा 200 गुणांची असते. त्यात कमीतकमी 66 गुण मिळवणं गरजेचं असतं. असं असलं, तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना परीक्षार्थींना सावध राहावं लागतं, कारण या पेपरला निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.83 गुण कमी केले जातात.

advertisement

काय आहेत टिप्स?

आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा यांच्या मते, अनेक विद्यार्थी सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळवतात, पण सीसॅटची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. हा पेपर सोपा असतो, असा अनेकांचा समज असतो, पण उमेदवारांनी या पेपरकडेही गंभीरपणे पाहिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. स्वतःला किती येतंय, हे पाहायचं असेल, तर उमेदवारांनी आधीच्या वर्षीचा सीसॅटचा पेपर दिलेल्या वेळेत सोडवून पाहावा. या पेपरमध्ये वेळेच्या नियोजनाकडे लक्ष द्यावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

advertisement

केवळ गणित चालणार नाही

सीसॅट परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी यूपीएससी टेस्ट सीरिजची मदत घेता येऊ शकते. गेल्या काही वर्षांमधले यूपीएससीचे पेपर सोडवले, तर याची खूप मदत होऊ शकते. या परीक्षेत तुम्हाला येणाऱ्या विषयांवर जास्त लक्ष द्या आणि ज्या विषयात कमकुवत आहात, त्याची जुजबी तयारी करा, मात्र कोणताही विषय सोडून देण्याची चूक करू नका. फक्त गणित पक्क आहे, म्हणून त्यावर अवलंबून राहू नका. कधी कधी आकलनाचे प्रश्न सोपे असतात, तर कधी गणित व रिझनिंगचे प्रश्न सोपे असू शकतात. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत असल्यानं उमेदवारांनी अधिक सावध राहून उत्तरं लिहावीत असं त्यांनी म्हटलंय.

advertisement

यूपीएससीची परीक्षा अत्यंत कठीण असते. विद्यार्थी त्यासाठी कसून अभ्यास करतात. सरकारी अधिकारी व तज्ज्ञांनी वेळोवेळी दिलेल्या टिप्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात.

मराठी बातम्या/करिअर/
UPSC : यूपीएससीच्या CSAT पेपरची तयारी कशी करावी? एका चुकीमुळे भंगू शकतं आयएएस होण्याचे स्वप्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल