सागर : केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी CUET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी तयारी करतात. मात्र, अगदी मोजक्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे मग भारतातील प्रतिष्ठित केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CUET परीक्षेत यश नेमके कसे मिळवावे हे, जाणून घेऊयात.
मध्यप्रदेशातील सागर येथील डॉक्टर हरिसिंह गौर विद्यापीठाला जेव्हापासून केंद्रीय विद्यापाठीचा दर्जा मिळाल्यापासून प्रवेशप्रक्रिया आणखीनच कठीण झाली आहे. प्रत्येक वर्षी येथील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेपासून, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते आणि त्यानंतर प्रवेश मिळतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास करण्यात अडचणी येतात.
advertisement
राष्ट्रीय परीक्षेचे नाव ऐकताच अनेक जण घाबरतात. मात्र, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर ती अतिशय सोप्या पद्धतीने पास होऊन जाल. तुम्हीही 2024 प्रवेशाची तयारी करत असाल आणि तुम्ही अर्ज केला असेल तर तज्ञांनी दिलेला हा सल्ला जर तुम्ही मान्य केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल.
instragram follower ने दिला upsc करण्याचा सल्ला, अन् Model च्या आयुष्यात झाला अभूतपूर्व बदल, photos
बारावीचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने वाचा -
डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठातील 11 विभागांचे प्रमुख प्राध्यापक दिवाकर सिंह राजपूत यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा विद्यार्थी 12वी स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून पुढील अभ्यासासाठी स्वत:ची तयारी करतात, तेव्हा त्यांनी इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम पूर्णपणे कव्हर करायला हवा. यासोबतच 10वी, 11वी आणि 12वीचे संपूर्ण विषय वाचा. तसेच काही सामान्य अभ्यासाची तयारी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या विषयात प्रवेश घेत आहात त्या विषयाचा अभ्यासक्रम पहा.
तणावमुक्त होऊन करा अभ्यासाची तयारी -
विद्यार्थ्यांनी सहज आणि कोणताही ताण न ठेवता तयारी केली तर ते सहज यश मिळवू शकतात. तुमचा जुना अभ्यासक्रम, तुम्हाला ज्या कोर्सला जायचे आहे, त्याची माहिती तसेच त्या कोर्सच्या अभ्यासक्रमात काय दिले आहे, त्याच्यावर फोकस करुन या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा काही फार अवघड अभ्यासक्रम नाही. हा एक सोपा कोर्स आहे. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता तणावमुक्त होऊन तयारी केल्यास विद्यार्थी नक्कीच यश मिळवेल. विद्यार्थ्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला तर तो नक्कीच यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले.
कधीपासून सुरू होतायेत परीक्षा -
दरम्यान, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट UG-2024 अंतर्गत, सागर विद्यापीठाचीही निवड देशभरातील विद्यापीठांसह प्रवेश परीक्षेसाठी निवड करता येईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रियेची काल 26 मार्च रोजी शेवटची तारीख होती. 15 मे ते 31 मे या कालावधीत परीक्षा घेण्यात येतील आणि 30 जून रोजी निकाल जाहीर केला जाईल.
