रांची : एअर होस्टेस होणे हे अनेक मुलींचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे, घरातील परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र, आज आपण एका अशा संस्थेबाबत जाणून घेणार आहोत, जे 100 टक्के स्कॉलरशिपसोबत एअर होस्टेसची ट्रेनिंग देणार आहे. यासाठी इच्छुक मुली अर्ज करू शकतात.
झारखंडची राजधानी रांची येथील हरमू चौक येथील स्कायलाईन एव्हीएशन अकादमीचे संचालक संजीत कुमार यांनी लोकल18 ला याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमची अकादमी 100% शिष्यवृत्तीसह एअर होस्टेसना प्रशिक्षण देणार आहे. पूर्वी ही शिष्यवृत्ती फक्त ST, SC प्रवर्गासाठी होती. पण ग्रामीण भागात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांना एअर होस्टेसचे शिक्षण परवडत नाही. म्हणून आता आता ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्गासाठी झाली आहे.
advertisement
या गोष्टींची घ्या काळजी -
संजीत कुमार यांनी सांगितले की, अर्ज करण्यासाठी मुलींकडे कोणत्या गोष्टी असाव्यात, ते माहिती असणे महत्त्वाचे आहे. मुलीची उंची ही 5 “2” यापेक्षा कमी नसावी. त्याशिवाय त्यांची त्वचा आरोग्यदायी असली पाहिजे. काही अडचण असेल तर, आम्ही त्यासाठी मार्गदर्शन करू. याशिवाय कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेली असावी. उमेदवार मुलीचा बीएमआय 18 ते 24 दरम्यान असावा. मात्र, मुलगी निरोगी असेल तर कोणतीही अडचण नाही. आम्ही त्यांना प्रत्येक प्रकारे मार्गदर्शन करू. तसेच मुलीचे वय 18 ते 25 दरम्यान असावे, असे ते म्हणाले.
Sanket Gawhale : विदर्भाचा लाल पुन्हा जाणार रशियात, महिन्याभरात दुसऱ्यांदा आलं निमंत्रण
या कंपनीत मिळते नोकरी -
संजीत कुमार यांनी सांगितले की, येथील फी ही 1 लाख 30 हजार रुपये आहे. मात्र, 100 टक्के शिष्यवृत्ती मिळाल्यावर मुलींना एकही रुपया खर्च येणार नाही. तसेच फक्त त्यांना ड्रेस खरेदी करावा लागेल. या व्यतिरिक्त काहीच नाही. येथे आल्यावर एक लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा आम्ही मूलभूत माहिती आणि त्यांच्या भाषेची माहिती तपासण्याचा प्रयत्न करतो.
प्लेसमेंटचा विचार केला तर मागच्या वर्षी 100 टक्के उमेदवारांना नोकरी मिळाली होती. याठिकाणी एअर इंडिया एअरलाइन्स, इंडिगो, फ्लाइट 91 आणि स्पाइसजेट यासारख्या कंपन्या येतात. त्यामध्ये येथील मुलींना नोकरी मिळते. एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या मुली 7982579024 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.
